सावधान या आहारामुळे यकृताच्या आजारांचा धोका बळावू शकतो

वॉशिंग्टन : काही लोकांना अतिशय चरबीयुक्त खाण्याची आवड असते. तुम्हाला चरबीयुक्त पदार्थ आकर्षित करून घेत असतील तर वेळीच सावधगिरी बाळगा. अशा प्रकारच्या आहारामुळे यकृताच्या आजारांचा धोका बळावू शकतो. एका ताज्या अध्ययनातून हा इशारा देण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, उच्च चरबी म्हणजे फॅट आणि कोलेस्ट्रॉलयुक्त आहारामुळे रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये बदल येऊ शकतो. 


ही स्थिती नॉन अल्कोहलिक फॅटी लीव्हर डीसिजचा गंभीर प्रकार नॉन-एल्कोहलिक (एनएएएसएच) आजारास आमंत्रण देणारी ठरू शकतो. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, जे लोक लठ्ठपणा वा टाइप-२ मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये साधारणपणे एनएएसएच हळूहळू सिरोसिस वा यकृत कर्करोगाचे रूप घेऊ शकते.

उंदरांवर करण्यात आलेल्या या अध्ययनामध्ये चरबीयुक्त आहारामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये बदल होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे यकृताची सूज वाढू शकते. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील केक स्कुल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक ह्युगो रोसेन यांनी सांगितले की, या अध्ययनातून असे स्पष्ट होते की, चरबी आणि कोलेस्ट्रॉल फक्त यकृताची सूजच वाढवत नाही तर त्याच्या आजारांचेही कारण ठरू शकते..
थोडे नवीन जरा जुने