स्मृती टिकवून ठेवण्याची एक नवीन पद्धत

लंडन : वाढत्या वयासोबत अनेकांमध्ये स्मृती कमजोर होत जाते. मात्र ही समस्या आता दूर होऊ शकेल. शास्त्रज्ञांनी म्हातारपणात स्मृती टिकवून ठेवण्याची एक नवीन पद्धत शोधून काढली आहे. हल्लीच झालेल्या एका अध्ययनातून असा दावा करण्यात आला आहे. पौष्टिक आहाराच्या सेवनासोबत आठवड्यातून किमान तीनदा ३५ मिनिटे चालणे वा सायकल चालविणे यांसारख्या हलक्याफुलक्या व्यायामामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारू शकते. 


शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, नियमित व्यायाम आणि योग्य आहारामुळे केवळ ह्रदयच ठणठणीत राहत नाही तर स्मृतीशी संबंधित कार्यक्षमतेमध्येही सुधारणा होऊ शकतो. उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या १६० वृद्धांवर करण्यात आलेल्या अध्ययनाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. स्मृतीशी संबंधित समस्येला तोंड देत असलेल्या या वृद्धांनी कधीच व्यायाम केला नव्हता. अमेरिकेतील ड्यूक युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ जेम्स ब्लूमेंथल यांनी सांगितले की, अशा पद्धतीद्वारे मेंदू आणि ह्रदयच्या आरोग्यात एकाच वेळी सुधारणा आणली जाऊ शकते..
थोडे नवीन जरा जुने