आचार्य चाणक्य सांगतात बुद्धिमान व्यक्ती तोच ज्याच्याकडे हे 4 गुण आहेत
बुद्धिमान व्यक्ती कोण असतो असे जर तुम्हाला विचारले तर तुम्ही कदाचित असे उत्तर द्याल की जो व्यक्ती परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवतो किंवा आपल्या लाईफमध्ये विचारपूर्वक निर्णय घेतो असेच काही तरी तुम्ही सांगाल. परंतु आचार्य चाणक्य त्यांच्या अनुसार बुद्धिमान व्यक्ती तो असतो जो आपले रहस्य लपवून ठेवतो. कारण जर माणसाने आपले रहस्य दुसर्या लोकांना सांगितली तर तो समाजामध्ये हास्याचे कारण बनतो.

आचार्य चाणक्य सांगतात की मनुष्याने कधीही आपल्या धर्माचे रहस्य, स्वादहीन भोजनाचे रहस्य आणि पत्नीच्या चारित्र्याबद्दल चे रहस्य कधीही कोणाला सांगू नये. आचार्य चाणक्य यांनी बुद्धिमान व्यक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तो नेहमी गुप्त ठेवतो.

आचार्य चाणक्य सांगतात की एक बुद्धिमान व्यक्ती कधीही आपल्या अपमानाबद्दल दुसऱ्यांना माहिती देत नाही. असे केल्यामुळे समाजांमध्ये त्याचा अजून जास्त अपमान होऊ लागतो. एवढेच नाही तर अपमानाबद्दल आपल्या घरातील सदस्यांनाही सांगू नये.

एका बुद्धिमान व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल कधी दुसऱ्याला काही सांगू नये. कारण असे केल्यामुळे आपसातील संबंध वाईट होऊ शकतात. तसेच दुसऱ्याच्या नजरेमध्ये तुम्ही हास्याचे कारण होऊ शकता.

आचार्य चाणक्य सांगतात की एक बुद्धिमान व्यक्ती तोच असतो जो आपल्या व्यापारा बद्दल माहिती गुप्तता ठेवतो. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या गरजेच्या वेळेस तुम्हाला मदत करणारा कोणीही नसेल. त्यामुळे व्यापारामध्ये फायदा झाला किंवा नुकसान झाले तरीही ते लपवून ठेवावे.

आचार्य चाणक्य सांगतात की व्यक्तीने आपल्या वैयक्तिक समस्या दुसर्यांना सांगितल्यास समाजातील लोक त्याचे समाधान सांगण्याऐवजी तुमची टिंगल उडवतात. त्यामुळे स्वतःच्या समस्याचे समाधान स्वतःच शोधावे. कधीही एका बुद्धिमान व्यक्तींने आपल्या समस्या दुसर्यांना सांगू नयेत.

थोडे नवीन जरा जुने