तरुणपणी चेहऱ्यावर येणारे मुरूमच असतात मोठी समस्या....
किशोरावस्थेतून तारुण्यावस्थेत प्रवेश करताना आपल्या शरीरात अनेक रासायनिक आणि हार्मोनल बदल वेगाने होत असतात. मुरुमांचा त्रास या वयातच अधिक होतो. ही समस्या गंभीर नाही, जेवढी ती समजली जाते. तुम्ही जर मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर इतरांच्या सांगण्यावरून कोणत्याही औषधाचा क्रीमचा किंवा उटण्याचा वापर करण् टाळा. कारण यामुळे अधिकच समस्या निर्माण होऊ शकते.मुरुम का येतात याचे नेमके कारण शोधा आणि मगच उपाय करा. 


डोक्यात कोंडा असणं
कोंडा झाल्यानंतर डोके खाजत. तर डोकं खाजवल्यानंतर कोंडा चेहऱ्यावर पडतो.रोमछिद्रामध्ये अडकतो. यामुळे रोमछिद्र बंद होतात. म्हणूनच कोंडा नाहीसे करण्याचे उपाय करा. सरसोच्या तेलात कापूर मिसळून तेलाने केसांना मालीश करा. केस धुण्यापूर्वी दही, लिंबू,आणि अंड मिसळुन सोन ते केसांना चोळा काकडीचा रस केसांना लावण्याने फायदा होतो. कधी कधी डेटॉल चे काही थेंब पाण्यात टाकून केस धुवा. केस रुक्ष राहणार नाहीत याची काळजी घ्या. रुक्ष केसांमध्ये कोंडा अधिक होतो.

दर्जाहीन सौंदर्य प्रसाधन
स्वस्त तेल आणि दर्जाहीन सौंदर्य प्रसाधनं किंवा सौंदर्यप्रसाधनांचा अधिक वापर करण्यानेही मुरूम येण्याची समस्या निर्माण होते.तर सौंदर्यप्रसाधन तुमच्या त्वचेला सूट होत नसतील तर त्याचा वापर करणं टाळा.

त्वचा तेलकट होणं
त्वचेच्या खाली असलेल्या तेलग्रंथी जर अधिक सक्रिय असतील तर त्वचा तेलकट दिसायला लागते.या तेलकट पणामुळे धूळ, माती,चेहऱ्यावर अगदी सहज चिटकते.रोमछिद्र बंद होतात आणि मुरूम येतात. म्हणून तेलकट त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. हवामानानुसार चेहऱ्याला क्रीम लावा. दिवसातून एक-दोन वेळा कडुनिंबाच्या साबनाने चेहरा धुवा. त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यासाठी लिंबाचा वापर जास्तीत जास्त करा. 


अपचनाचा त्रास
पोट खराब असल्यासही मुरुमांचा त्रास होतो. योग्य प्रकारे आहाराचे सेवन न करणे, घाणेरड्या हाताने जेवण करणे, खाद्यपदार्थांची योग्य स्वच्छता न करताच शिजविण्याने ही पोट खराब होत.

मासिक पाळीत अनियमितता
मासिक पाळी अनियमित असेल, जास्त किंवा कमी रक्‍तस्राव होत असेल किंवा लवकर अथवा उशिरा येत असेल तर या सगळ्यामुळे मुरूम येतात.

Acne is a major problem facing young people
थोडे नवीन जरा जुने