गरम दुधात 1 चमचा शतावरी घाला आणि हे दूध प्या हे होतील फायदे


वाढतं वजन ही सध्याची सर्वात मोठी समस्या आहे; पण वजन कमी करण्यासाठी चयापचय क्रिया उत्तम असणं गरजेचं असतं. चयापचय क्रियेचा वेग जेवढा जास्त असेल तेवढंच शरीर कॅलरींचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करू शकेल. यामुळे अतिरिक्त चरबी जळेल आणि वजनही कमी होईल. चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय उपयुक्त ठरू शकतील.



गरम दुधात 1 चमचा शतावरी घाला आणि हे दूध प्या.

शतावरीमुळेही पचनशक्ती सुधारते. शतावरी अत्यंत गुणकारी आयुर्वेदिक वनौषधी आहे. यामुळे पचनशक्ती सुधारते. चयापचय क्रियेचा वेग वाढतो आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. 

शतावरी चूर्ण शरिरामधील तणाव हार्मोन कमी करतो आणि  मन तणावमुक्त बनवते. 

 शतावरी महिलांसाठीच्या फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे. ती त्यांची लैंगिक क्षमता वाढवते, हार्मोन्सला संतुलित करते आणि प्रजननक्षमता सुधारते. शतावरी घेतल्याने मासिक धर्मातील वेदना कमी होते आणि मासिक धर्म नियमित झाल्याचे आढळले आहे.
अजूनही हे आयुर्वेदिक उपचार जाणून घ्या - 

आवळ्याच्या नियमित सेवनामुळे चयापचय क्रिया सुधारेल. यासोबतच सर्वांगीण आरोग्य उत्तम राहील. केसांच्या वाढीसाठीही आवळा उपयुक्त ठरतो. आवळ्याच्या रसानेही लाभ होऊ शकेल. त्यामुळे आहारात आवळ्याचा समावेश करा.


अश्वगंधाचे बरेच लाभ आहेत. अश्वगंधाच्या नियमित सेवनामुळे चयापयच क्रिया सुधारते. यासाठी अश्वगंधाची पूड आहारातून घ्या. ही पूड कणकेत किंवा चहात घालता येईल.

ज्येष्ठमधामुळेही चयापयच क्रियेचा वेग वाढतो. यासाठी दररोज एक ते पाच ग्रॅम ज्येष्ठमधाचं सेवन करता येईल. ज्येष्ठमधामुळे ताण कमी व्हायला मदत होते. स्मरणशक्ती सुधारते. मानसिक आरोग्यही उत्तम रहातं. ज्येष्ठमधामुळे पचनसंस्थेलाही थंडावा मिळतो.


 जायफळही औषधी आहे. आहारात मर्यादित प्रमाणात जायफळाचा समावेश करायला हवा. कॉफीमध्ये जायफळ घातलं जातं. जायफळ घातलेलं दूधही पिता येईल. यामुळे शांत झोपही लागेल.

थोडे नवीन जरा जुने