नेहमी आरोग्याबाबत घ्या आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला...


‘हे करा’, ‘ते करू नका’ असे सल्ले बालपणापासूनच ज्येष्ठांकडून ऐकायला मिळतात. याउलट आरोग्यतज्ज्ञांच्या मते, अनेक गोष्टींना कसलाही वैज्ञानिक आधार नाही, तरी त्यांचे अनुसरण केले जाते. प्राचीन काळापासून ज्या गोष्टी आपण ऐकत आलो आहोत, त्या गोष्टींचे पालन आजही काही लोक डोळे झाकून करतात. यापैकी बर्‍याच गोष्टी केवळ भ्रम आहेत, असे तज्ज्ञ म्हणतात. आरोग्याबाबत दिल्या जाणार्‍या, मात्र वास्तवाशी काहीही संबंध नसणार्‍या अशाच काही सल्ल्यांबाबत जाणून घेऊया.


काहीही करून दिवसभरात आठ ग्लास पाणी प्यायला हवे -

तज्ज्ञांच्या मते, केवळ पाणी पिऊन शरीर हायड्रेट (पाणीपातळी कायम ठेवणे) करता येत नाही. याशिवाय ताज्या फळांचा ज्यूस, दूध व भरपूर भाज्यांचे सेवन करणेही तेवढेच आवश्यक आहे. इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या चिल्ड्रन्स हेल्थ सर्व्हिस रिसर्चनुसार, वरील सर्व खाद्यपदार्थांचे सेवन केले तर पाणी पिण्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. याउलट व्यक्ती केवळ पाणी पिण्यावर भर देत असेल तर शरीरात इलेक्ट्रोलाइट असंतुलित होतात आणि सोडियमची पातळी घसरते.

अधिक ताण घेतल्यास केस पांढरे होतात - 

‘मेडिकल मिथ्स डेट किल यू’च्या लेखिका नॅन्सी एल. सिडरमॅन म्हणतात की, अतिताण नक्कीच पीडिताचे अंतर्गत व बाह्य पातळीवर नुकसान करतो. तणावामुळेच फ्री रॅडिकल्सची संख्या वाढते आणि निरोगी पेशींचे नुकसान होते. मात्र, तणावामुळेच केस पांढरे होतात, यास काहीही वैज्ञानिक आधार नाही. भोजनात पोषक घटकांचा अभाव आणि आनुवंशिक कारणांमुळेही असे होते.

कमी प्रकाशात वाचन डोळ्यांसाठी हानिकारक आहे - घरातील ज्येष्ठ नेहमी सांगत असतात की, कमी प्रकाशात वाचल्याने दृष्टीवर परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, कमी प्रकाशात वाचल्याने डोळ्यांवर दबाव पडतो. यामुळे डोकेदुखी, डोळे लाल वा कोरडे होऊ शकतात. मात्र, डोळ्यांचे कायमस्वरूपी नुकसान होत नाही. रात्री पुरेशी झोप घेऊन वरील लक्षणांपासून सुटका होऊ शकते.

अंड्यामुळे वाढते कोलेस्टेरॉल, जे हृदयासाठी हानिकारक आहे - एका संशोधनानुसार, सॅच्युरेटेड व ट्रान्सफॅटमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, डायटरी कोलेस्टेरॉलमुळे नव्हे. एका अंड्यात 1.6 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असते. ते एक कप दुधातील 3 ग्रॅमबरोबर असते. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’नुसार, दररोज 300 मिलिग्रॅमपेक्षा अधिक फॅट आहारात समाविष्ट करू नये. अंड्यातून भरपूर प्रथिने, अ व ड जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे नाश्त्यात एका अंड्याचा समावेश अवश्य करावा. अंड्यामुळे शरीराला फायदाच होतो. त्यामुळे अंडे रोज खावे.

ताप असताना कमी भोजन किंवा पथ्य पाळायला हवे - असे बिलकुल नाही. ताप व सर्दी-पडशासाठी बाह्य संक्रमणे कारणीभूत असतात. अशा प्रकारचा व्हायरल फीव्हर (विषाणुजन्य ताप) 7-10 दिवसांत बरा होतो. मात्र, या काळात कमी भोजन करू नये वा भोजनाबाबत पथ्य पाळू नये. अशा स्थितीत पीडिताच्या स्वाद ग्रंथी सुरळीतपणे काम करत नाहीत. त्यामुळे पीडिताला काहीतरी खावे वाटते. मात्र, पीडिताने पेय सेवन केल्यास बरे.

Always seek health advice from a healthcare professional
थोडे नवीन जरा जुने