अपयश येणा-या ' त्या ' क्षणी...

आयुष्यात अनेकदा अपयशाचे प्रसंग येतात सगळं काही हरलो आहोत , असं वाटतं . कुठलाच मार्ग दिसत नाही . नवा पर्याय सुचत नाही.अपयशामुळे आपण खचून जाणार आहोत , असेही विचार क्वचित मनात येऊ लागतात . 


पण , हीच वेळ असते , स्वतःला सावरण्याचे आणि स्वतःमधील क्षमतांची स्वतःलाच ओळख करून देण्याची. अपयश आलेल्या कुठल्याही कालखंडात , कुठलेही वाईट , नकारार्थी विचार , आपल्याला संपवायला बघतील. 

पण , त्यापूर्वीच चेहऱ्यावर हास्य अणा, अन् स्वतःलाच सांगा की, मी या जगात अजूनही जिवंत आहे , याचाच अर्थ मला अजूनही जिंकण्याची संधी आहे ... अन् । ती संधी मी साधणारच ...

At that 'moment' of failure
थोडे नवीन जरा जुने