'अशा' प्रकारे टाळा म्हातारपणात एकटेपणा...


एकटेपणापासून बचाव करण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अ‍ॅडव्हान्स प्लॅनिंग . 

तारुण्यावस्थेतच म्हातारपणात एकटेपणा येणार नाही ,यासाठी प्रयत्न करायला हवेत . कारण मोट्या वयात नवे मित्र बनवणं अवघड असतं . म्हातारपणात एकटेपण खायला उठतो . काही प्रमाणात एकटेपणा भासतो .पण याने जर आजारपणच रूप घेतलं तर एकटेपण घातक होऊ शकतं .प्रौढ वयात एकटेपणाची कारण आणि त्यावरच निदान याविषयी तज्ज्ञ म्हणतात, म्हातारपणात अनेक आरोग्याविषयी समस्या डोकं वर काढतात, त्यामध्ये एखाद्या प्रिय व्यक्तीच निधन , जीवनसाथी दुरावण , मुलं लांब जाणं या कारणांचा परिणामही होतो . या सगळ्यामुळे व्यक्तीला नैराश्य आणि ताण येऊ लागतो . नैराश्य ही एकटेपणाची सगळ्यात मोठी समस्या आहे . 

कसं समजतं ? - 
तुम्ही सतत मध्य एकटेपणाबद्दल विचार करून त्रस्त असाल , होत असाल , पहाटे तीन - चार वाजताच तुम्हाला जग येत असेल आणि त्यानंतर जागच राहावं लागत असेल , अंथरुणावर पडल्या पडल्या तुम्ही एकटेपणाचा विचार करता का , तुमच्या मनात मृत्यूचे विचार देतात का , भूक लागत नाही का , गेलेल्या प्रियजनांची आठवण येते का ? तुमच्या बाबतीत असे घडत असेल , तर तुम्हीसुद्धा एकटेपणाने त्रस्त आहात . लक्षात घ्या तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे .

कसं वाचाल ? -
एकटेपणापासून बचाव करण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ऍडव्हान्स प्लॅनिंग , तारुण्यावस्थेच म्हातारपणात एकटेपण येणार नाही यासाठी प्रयत्न करायला हवेत . कारण नोठया वयात नवे मित्र बनवणं अवघड असतं म्हणून सुरुवातीपासूनच तुमची वागणूक सगळ्यांना सामावून घेणारी असावी. नातेवाइकांशी संपर्क आणि आयुष्यभर संबंध जपायला हवेत . जर निवृत्तीनंतर एकदम तुम्ही एकमेकांना भेटायल गेलात , तर ते वेगळं वाटेल .


काय करु नये ? - 

अशा जागी जाऊन बसू नका , जिथे तुम्ही कोणाला आणि तुम्हाला कोणी ओळखत नाही . पाश्च्यात संस्कृतीत अशी प्रथा आहे की लोक म्हातारपणात पर्वतावर, हिरवळीच्या ठिकाणी किंवा समुद्र किनारी स्वप्नांच्या महागड्या घरात जाऊन राहतात , पण काही काळानंतर तिथे कुणीच न भेटल्याने एकटेपणाचा कंटाळात आणि यांचं आयुष्य एकाकी , कंटाळवाणं होतं. अशा जागी जाऊन राहाणं त्रासदायक ठरतं.

Avoid 'loneliness' with loneliness in old age
थोडे नवीन जरा जुने