ओकारी होते किंवा मळमळ होते म्हणून प्रवास टाळताय ? करा हे घरगुती उपाय




केवळ ओकारी होते किंवा मळमळ होते म्हणून अनेक प्रवास टाळतात. पण प्रवासात होणारी मळमळ आणि ओकारी ही थांबवता येऊ शकते.


कसा कराल यापासून बचाव?
लिंबू हे ओकारी आणि मळमळवर एक प्रभावी उपाय आहे. हजारों वर्षांपासून लिंबूचा उपयोग यासाठी केला जातो. आजही काही वृद्ध व्यक्ती प्रवासाला जाताना सोबत लिंबू ठेवतात. तुम्ही जेव्हा प्रवासात असाल तेव्हा तुम्ही सोबत एक लिंबू ठेवू शकता. जेव्हा मळमळ वाटेल तेव्हा तो लिंबू शिलून घ्या आणि त्याचा वास घ्या. त्याने मळमळ थांबते.

प्रवासात नेहमी लवंग ठेवावी. मात्र ही लवंग जर कुटलेली असेल तर आणखी छान. जेव्हा पण तुम्ही प्रवासात असाल तेव्हा कुटलेली एक चिमटा लवंग साखर किंवा काळ्या मिठासोबत खाल्ली की आराम मिळतो. यासोबतच तुळशीच्या पानासोबतही लवंग खाता येऊ शकते.

पुदिना हा खूप गुणकारी आहे. जेव्हा प्रवासात असाल तेव्हा एका बॉटलमध्ये लिंबू आणि पुदिन्याचा रस भरून सोबत ठेवा. त्यात काळ मिठंही तुम्ही टाकू शकता. प्रवासात हा रस थोडा थोडा पिल्यानं आराम मिळतो.

वेलचीनेही प्रवासात खूप आराम मिळतो. प्रवासात जाण्याच्या आधीही तुम्ही वेलचीचा वापर करू शकता. प्रवासात जाण्याच्या आधी वेलची टाकलेला चहा पिल्यास प्रवास आरामात होतो.

मिरे हे देखील ओकारीवर गुणकारी आहे. लिंबू त्यावर मिरे पावडर आणि काळं मीठ टाकून हे चाटल्यास आराम मिळतो. प्रवासात तुम्ही मध्ये मध्ये हे चाटल्यास आराम मिळतो.

जलजीरा हे ओकारीवर गुणकाही आहे. तसंच ते शरीराला थंडावाही देतो. पाण्यामध्ये जी-याची पुड टाकून पिल्यास मळमळ थांबते.
आलं टाकलेला चहा पिणं हा देखील प्रवासातील एक उपाय मानला जातो. आल्यामध्ये ऍन्टी एमेटिक तत्व असतात त्यामुळे आल्याचं प्रवासात सेवन केल्यास ओकारी आणि मळमळीपासून आराम मिळतो.

थोडे नवीन जरा जुने