सौंदर्य प्रसादने वापरताना 'हि' काळजी घेतलीच पाहिजे !


सर्व सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जिथे शक्य आहे तिथे डब्याऐवजी ट्यूब वापरावी. सौंदर्य प्रसाधनांचे डबे, बाटल्यांची झाकणे गच्च लावून बंद ठेवावेत. सौंदर्य प्रसाधनांच्या डब्याचं झाकण नीट लागत नसेल तर, त्यात सूक्ष्म जीव जाऊ शकतात.

उष्णता आणि प्रकाश यापासून सौंदर्य प्रसाधने दूर ठेवावीत. त्वचेला किंवा डोळ्याला इन्फेक्शन झालेले असताना सौंदर्यप्रसाधने वापरू नयेत. डॉक्टरांचा सल्ला ताबडतोब घ्यावा. इन्फेक्शन झाले आहे हे जेव्हा कळते तेव्हा वापरत असलेली सर्व सौंदर्य प्रसाधने फेकून द्यावीत व नवीन वापरावीत. कोणत्याही सौंदर्य प्रसाधनाचा रंग बदलला असेल, त्याला घाणेरडा वास येत असेल, घेतांना ते ज्या स्वरुपात (म्हणजे क्रीम, द्रव, घट्ट) होते तसें न राहता बदलले असेल, तर कोणताही विचार न करता ते फेकून द्यावे.

आपली सौंदर्य प्रसाधने दुसर्‍याला वापरायला देऊ नयेत. दुसर्‍याची आपण वापरू नयेत. कोणतेही सौंदर्य प्रसाधन कडक झाले म्हणून मऊ करण्यासाठी पाणी किंवा थुंकीचा वापर अजिबात करू नये. हेअर स्प्रे तसेच डीओडरन्ट, पावडर लावताना ते नाकात, डोळ्यात जाणार नाही. याची काळजी घ्यावी लागते. तसेच कोणताही स्प्रे उष्ण वस्तूंजवळ नेऊ नये. सिगारेट ओढतांना स्प्रे वापरू नये. मेकअप करायच्या आधी हात आणि चेहरा स्वच्छ धुतले पाहिजेत.

सौंदर्य प्रसाधनांचा वापर करताना अनेक वेळा ब्रश, स्पंज वगैरे वापरावे लागतात. हे स्वच्छ ठेवणे अगदी आवश्यक असते. हेअरब्रश व कंगवे केस शाम्पू करण्याआधी स्वच्छ करावेत. कोमट पाण्यात शाम्पू घालून त्यात बुडवावेत. मग हलकचे घासून साफ करावेत.

ब्रशचे केस पूर्ववत करून कंगवे व ब्रश टॉवेलवर ठेवून वाळवावेत. कंगवा फार तेलकट झाल्यास व्हिनेगर घातलेल्या पाण्यात बुडवून ठेवावा. मग धुवावा. मेकअपसाठी वापरलेले ब्रश, स्पंजसुद्धा कोमट पाण्यात थोडा शाम्पू घालून त्याने धुवावेत. दर एक वर्षाने मेकअपचे ब्रश, स्पंज बदलावेत. मस्कारा वगैेरे लावायला वापरले जाणारे अ‍ॅप्लिकेटर्सही आठवड्यातून एकदा तरी धुवावे लागतात. हे सर्व धुण्यासाठी शक्यतो बेबी शाम्पू वापरावा. रात्री झोपतांना क्लीन्झिंग क्रीम कापसाच्या बोळ्यावर घेऊन मेकअप पुसून काढावा किंवा मेकअप रिमूव्हरने काढून टाकावा. मग चेहरा स्वच्छ धुवून चेहर्‍याला मॉइश्चरायझर लावून झोपावे.

अशाप्रकारे सौंदर्य प्रसाधनांची नीट काळजी घेतली गेली तर उत्तम प्रसाधन दर वेळी केल्याचं समाधान नक्की मिळेल.

Beauty should be taken care of when using it
थोडे नवीन जरा जुने