मुलींच्या या नख-यांवर घायाळ होतात मुले ! जाणून घ्या...


मुलं मुलींच्या केवळ सुंदरतेवर किंवा हॉटनेसवर फिदा होतात असे नाहीतर मुलींच्या नख-यांवरही जीव ओवाळतात. मुलींच्या या नख-यांचेच अनेक मुलं दिवाने असतात. मुलींच्या अशा कितीतरी अदा असतात यावर मुले घायाळ होतात. तर मुलींना हे महैतीही नसतं की त्यांच्या कुठल्या अदांवर मुलं जीव ओवाळतात.

मोकळे केस: असे म्हणतात की, हवेमुळे मुलींच्या चेह-यावर जेव्हा त्यांचे केस सरकतात तेव्हा मुलांची त्यांच्यावरून नजर हटत नाही. तर काही मुलांनी वेणी घातलेल्या मुलीही आवडतात. सतत आपल्या केसांसोबत खेळणं ही मुलींची सवय असते. हीच अदा अनेकांना आवडते.

 गंमतीशीर अंदाज: मुलींचा ह्य़ूमरही अनेकांना भावतो. मुलांपेक्षा मुलींचा ह्यूमर जरा वेगळा असतो त्याकडे मुले आकर्षित होतात. त्यांचं विनोदी पद्धतीने बोलणं, स्वत:वरच हसणं, हे मुलांना खूप आवडतं.

नो टेन्शन विचार: इतरांपेक्षा वेगळा विचार करणारी, स्व:ताच्या विचारांनी वागणा-या मुली मुलांना आवडतात. या मुली दुसरे काय करतात याचा विचार अजिबात करत नाहीत, त्यांना काय करायचे आहेत ते त्या करतात.

 हुशार मुली: हुशार मुली सर्वांनाच पसंत असतात. सुंदरतेसोबत स्मार्टनेस असला तर सोने पे सुहागा…ज्या मुली मालिकां व्यतिरिक्त देशात होत असलेल्या इतरही गोष्टींवर त्यांचे विचार व्यक्त करतात अशा मुली मुलांना अधिक आवडतात.

खुल्या विचारांच्या मुली: ज्या मुली स्वत:च्या विचारांनी तिला मिळालेलं स्वातंत्र्य संतुलित करून वागते, अशा मुली मुलांना अधिक भावतात. अशा मुली स्पष्ट वक्त्या असतात त्यामुळे त्यांच्या वागण्यातही एक स्पष्टपणा असतो, जो मुलांना आवडतो.

क्यूट हास्य: मुलांना नेहमीच तोंडाला मेकअप फासलेल्या मुली आवडतात असं नाहीये, काही मुलांना साध्या मुलीही आवडतात. त्यांच्यातील सुंदर स्मित हास्य मुलांना अधिक भावतं. मुलींचं लाजत हसणं हे तर अनेकांना घायाळ करतं.

साहसी मुली: ज्या मुली साहसी बेधडक असतात अशा मुलीही मुलांचं मन चोरतात. अशा मुली त्यांचं आय़ुष्य बिनधास्त पद्धतीने जगतात, त्यांच्यात एक वेगळेपण असतं. जे मुलांना त्यांच्याकडे आकर्षित करण्यास कारणीभूत ठरतं.

स्पष्टवक्त्या मुली: स्पष्टपणा हा तसा अनेकांना आवडत नाही पण काही मुले असे असतात ज्यांना स्पष्ट बोलणा-या मुलीही आवडतात. उगाच खोटं खोटं बोलून इतरांना इम्प्रेस करणं हे काही मुलांना पटत नाही, त्यामुळे जे आहे ते तोंडावर बोलणा-या मुलीही मुलांना भावतात.

Boys get injured on these girls' nails! Learn
थोडे नवीन जरा जुने