चाणक्य नीती : ही माणसे कोणालाच घाबरत नाहीतदुसऱ्यांच्या चुकांमधून शिका. स्वत: वर प्रयोग करून शिकाल तर तुमचे वयही कमी पडेल, असे चाणक्य सांगत. काही लोक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत नाहीत. आलेला प्रत्येक दिवस ती जगतच असतात. मात्र ज्यांना पुढे जायचे असते ते परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतात.
अशी माणसे कशालाही घाबरत नाहीत. भूतकाळातील घटनांविषयी पश्चाताप न करता भविष्यात आपले कार्य सुधारणारे यशस्वी होतात. भूतकाळच उगाळत बसणारा व्यक्ती त्याच काळात उडकून पडतो. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वत: ही तीन प्रश्न विचारा, मी हे कशासाठी करतो? त्याचा परिणाम काय होईल? मला यश मिळेल का? या प्रश्नांचे उत्तर समाधानकारक मिळेल तेव्हा निश्चिंतपणाने पुढे जा.

कोणतीही व्य‍क्ती आपल्या कर्तृत्वाने महान होते. जन्माने नव्हे. सन्मान मागितल्याने मिळत नाही, तो आपल्या कतृत्त्वातून मिळवावा लागतो. सदासर्वदाकाळ कोणालाही दहशतीखाली किंवा उपकाराखाली दाबून कोणतेही काम करवून घेता येत नाही. मित्राची स्त्री, गुरुस्त्री, भगिनी, परस्त्री यांच्याशी संबंध करु नये असे चाणक्य सांगतो.

चुकीच्या मार्गाने पैसा, स्त्री मिळविणारा सुखी राहात नाही. आपली संस्कृती, सभ्यता पालन केली पाहिजे. विद्यारर्थ्यांचे प्रथम कर्तव्य हे शिक्षण घेणे आहे. माता-पित्यांची सेवा हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. घराबाहेर पडताना आपण नेमके कुठे जातोय हे सत्यकथन स्वजनांजवळ केले पाहिजे.
थोडे नवीन जरा जुने