आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी रोज थोडाफार व्यायाम केलाच पाहिजे...

झपाट्याने बदलत चाललेल्या धावपळीच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात लोक व्यायायाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. व्यायामाअभावी जगभरातील १.४ अब्जाहून अधिक व्यक्तींचे आरोग्य धोक्यात असल्याचा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संस्था अर्थात 'डब्ल्यूएचओ'ने दिला आहे. या नि्क्रिरयतेमुळे कर्करोग, मधुमेह, स्मृतिभ्रंश आणि हृदयाशी संबंधित घातक आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे संस्थेने म्हटले आहे. 


जागतिक पातळीवर २००१ ते २०१६ सालादरम्यान लोकांच्या व्यायाम प्रक्रियेमध्ये समाधानकारक सुधारणा झालेली नाही. लोक व्यायामाला टाळत असल्याचे दिसून येत असल्याचे 'डब्ल्यूएचओ'ने आपल्या अहवालात म्हटले आहे. जगभरात तीनपैकी एक महिला आणि चारपैकी एक पुरुष स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसतात. 

त्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्मृतिभ्रंश आणि कर्करोगासारख्या विविध आजारांचा सामना करावा लागतो. नियमितपणे व्यायाम केल्यास यासारख्या आजारांना दूर ठेवले जाऊ शकते, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. जगभरातील १९ लाख महिला आणि पुरुषांच्या माहितीचे विश्लेषण करत यासंबंधीचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. 

त्यानुसार २०१६ मध्ये जगभरातील ३२ टक्के महिला आणि २३ टक्के पुरुष शारीरिकदृष्ट्या नि्क्रिरय आढळले. २०२५ पर्यंत बैठी जीवनशैली १० टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय कधीही साध्य होणार नाही, असे 'डब्ल्यूएचओ'ने म्हटले आहे.
Daily exercise is essential for maintaining good health
थोडे नवीन जरा जुने