दररोज एका आवळ्याचे 'असे' करा सेवन आणि फरक पहा


तुरट व आंबट चवीचे, हिरव्या रंगाचे अत्यंत गुणकारी औषधी फळ म्हणजे आवळा. आयुर्वेदामध्ये आवळ्याचा उपयोग विविध आजारामंध्ये केला जातो. आवळा हे फळ हिवाळ्यामध्ये होत असले तरी त्यापासून मोरावळा तयार करून तो मग वापरण्याची एक पद्धत आहे.
या पद्धतीमुळे उन्हाळ्यामध्ये देखील आवळ्याच्या गुणधर्माचा आपल्या शरीरासाठी उपयोग होतो. आवळा हा स्वभावत:च थंड आहे.

आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट, श्वासरोग दूर आणि हृदय मजबूत होते. नेत्रदृष्टी व आतड्यांची कार्यशक्ती वृद्धी होते. यकृत स्वस्थ होऊन पचनशक्ती वाढते. आवळा रक्तशुद्धीकरण व रक्ताभिसरणातही गुणकारी असून विर्याचा स्रोत आहे. हा आयुष्यवर्धक तसेच सात्विक वृत्ती जागृत करून ओज आणि कांती वाढवणारा आहे.

आवळ्याचे आणखी काही रामबाण उपाय -

सुकेलेल आवळे तसेच धने समप्रमाणात घेऊन रात्री मातीच्या भांड्यात भिजत ठेवावे. सकाळी ते पाणी गाळून त्यात खडीसाखर मिसळून प्यावे. यामुळे लघवीची जळजळ थांबते तसेच मुत्ररोगांमध्ये लाभ होतो.

दररोज सकाळी आवळ्याचा मुरंबा खाल्याने पोट साफ राहते. शरीरातील सुस्ती व अशक्तपणा दूर होतो. मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित मुरंबा खावा.


रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढणे, मानसिक तणाव (विषाद) अनिद्रा यांसारख्या व्याधींमध्ये २० ग्रॅम गाजराच्या रसात ४० ग्रॅम आवळ्याचा रस मिसळून सेवन केले पाहिजे.

दोन चमचे आवळ्याचा रस आणि दोन चमचे कच्च्या हळदीचा रस मधासोबत घेतल्याने प्रमेह दूर होतो. काही दिवस हा प्रयोग केल्याने मधुमेह नियंत्रणात येतो तसेच सर्व प्रकारच्या मुत्रसंबंधी व्याधींपासून सुटका होते.जो मनुष्य १० ते १५ मि.ली. आवळ्याचा रस, १० ते १५ ग्रॅम मध, १० ते १५ ग्रॅम खडीसाखर, २० ग्रॅम तूप मिसळून त्याचे चाटण घेतो तसेच आहारात पथ्य पाळतो, त्याच्यापासून वृद्धावस्था दूरच राहते.

15 ते 20 मि.ली. आवळ्याचा रस तसेच एक चमचा मध मिसळून त्याचे चाटण घेतल्यास दृष्टी तीक्ष्ण होते. आवळ्याचा रस आणि शुद्ध मध समप्रमाणात घेऊन मिसळावे. या मिश्रणाचे दररोज रात्री डोळ्यांना अंजन केल्यास डोळ्यांचा अंधुकपणा जातो. हे मिश्रणाच्या सेवनानेही लाभ होतो.


१-२ आवळे आणि १०-२० ग्रॅम काळे तीळ रोज सकाळी चावून खाल्याने स्मरणशक्ती वाढते.आवळ्याचा रस घृतकुमारीसह(कोरफड) प्यायल्याने पित्ताचे शमन होते.

सर्दी किंवा कफाचा त्रास असेल तर आवळ्याच्या १०-२० मि.ली. रसात १ ग्रॅम चूर्णात पाव चमचा हळद टाकून घ्यावे.


पिवळे दात पांढरेशुभ्र करण्यासाठी दातांवर आवळ्याच्या रसाची मालिश करावी. आवळ्याच्या रसात मोहरीचे तेल मिसळून हिरड्यांवर हलकी मालिश केल्यानेही खूप लाभ होतो.

२५० ग्रॅम आवळा चूर्णात ५० ग्रॅम वाटलेल्या लसणाची पेस्ट मिसळून हे मिश्रण मधात मिसळून १५ दिवस उन्हात ठेवावे. त्यानंतर दररोज एक चमचा मिश्रण खावे. हे एक उत्तम हृदयपोषक आहे. हा प्रयोग हृदय मजबूत बनविणारा एक सोपा उपचार आहे.थोडे नवीन जरा जुने