कोणत्याही कारणासाठी रोजच्या आनंदाशी तडजोड नको...


एखाद्या अशा व्यक्तीला आपण कधी भेटतो की , जो कालपर्यत मोठमोठी स्वप्नं रंगवत होता , महत्त्वाकांक्षा मनात धरून बसला होता , आणि त्यासाठी ' आज ' च्या आयुष्याशी तडजोड करत होता , त्याचा अचानक अपघात झाला किंवा  एखाद्याला लकवा मारला , एखाद्यावर कधीतर अचानकच बायपास करण्याची वेळ आली आणि त्याच्या आयुष्यातला पुढचा आनंदच हिरावला . . . तर . . ही अशी उदाहरणं पाहता , असं वाटतं की , आयुष्यातले हे छोटेछोटे आनंदाचे क्षण गमावू नयेत.आयुष्य पुढे ढकलू नये . असाच विचार करावा की , हा शेवटचा महिना आहे आणि त्यात अगदी दिलखुलासपणे जगायचं आहे , तर आपण कसे जगू . ? हाच विचार मनात ठेवून रोजच्या आयुष्याला सामोरं गेलं पाहिजे . पण , कोणत्याही कारणासाठी रोजच्या आनंदाशी तडजोड नको .
Do not compromise on daily happiness for any reason
थोडे नवीन जरा जुने