चुकूनही 'या' लोकांची उडवू नका, कारण जाणून घ्या

हास्य-विनोद आपल्या जीवनाचा एक भाग आहे. जीवनात हास्य नसेल तर सर्वकाही निरस वाटू लागते. असेही म्हणतात की, हास्य मनुष्य असल्याची निशाणी आहे. काही लोक असेही असतात जे, इतरांची खिल्ली उडवून हसतात. ही गोष्ट अत्यंत वाईट आहे.

 आपण सामाजिक बंधनात राहून एखाद्याची खिल्ली उडवू शकतो, परंतु टिंगल, खिल्ली उडवण्याच्या नादात एखाद्याचा अपमान करणे किंव त्याला दुःख होईल असे काम चुकूनही करू नये. मनुस्मृतीमध्ये कोणकोणत्या लोकंची टिंगल उडवू नये, या संदर्भात खास माहिती सांगण्यात आली आहे.

कमी अवयव असलेले हीन अवयव असणारे लोक म्हणजे ज्यांच्या शरीराचा एखादा अवयव निकामी किंवा अपूर्ण असणे उदा - लुळा, लंगडा, अंध, बहिरा इ. काही लोक जन्मापासूनच हीन अवयवाचे असतात तर काही लोक अपघातामध्ये अपंग होतात. मनुस्मृतीनुसार अशा लोकांची कधीही टिंगल उडवू नये, कारण कमी अवयावांमुळे ते सर्वात पहिले सहानुभूतीचे पात्र असतात. नैतिकदृष्टीने आपण त्यांची मदत करणे आवश्यक आहे. जर आपण अशा लोकंची खिल्ली उडवली तर ते दुःखी होऊ शकतात. याचा वाईट अनुभव आपल्याला कोणत्या न कोणत्या रुपात भविष्यात मिळतो.

काही लोकांच्या शरीरावर अधिक अंग असतात उदा हात किंवा पायाला सहा बोटे असतात. मनुस्मृतीनुसार शरीरावर अधिक अवयव असलेल्या व्यक्तीचीही खिल्ली उडवू नये, कारण ते जन्मजातच असे असतात. परमेश्वराने त्यांना याच रुपात पृथ्वीवर पाठवले आहे. जर आपण अशा लोकांची खिल्ली उडवली तर समजून घ्यावे की आपण परम पिता परमेश्वराची खिल्ली उडवत आहोत. अशा लोकांची खिल्ली उडवल्यास वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे अशा लोकांची टिंगल उडवू नये.

नकळतपणे आपण अनेकदा विचार न करता कोणाचीही खिल्ली उडवतो. हे शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे, यामुळे आपण असे वागू नये. जर एखादा व्यक्ती निरक्षर असेल तर आपण त्याची मदत केली पाहिजे. व्यक्ती निरक्षर असण्यामागे कौटुंबिक किंवा सामाजिक कारण असू शकते. अशा व्यक्तीची खिल्ली उडवून आपण त्याला दुःख देत असतो. यामुळे चुकूनही आपल्यापासून कोणाला दुःख होईल असे वागू नये.

आपल्यापेक्षा वयाने मोठी असलेली व्यक्ती आदर, मान-सन्मानाच्या योग्य असते. लहानपणापासून आपल्याला ही शिकवण दिली जाते. वय जास्त झाल्यामुळे वृद्ध लोक असे काही काम करून जातात, ज्यामुळे त्यांची खिल्ली उडवली जाते. अनेक वृद्धांसोबत घरात अशा घटना घडत असतात. चुकूनही आपण वृद्धांची खिल्ली उडवू नये, उलट त्यांची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे त्यांना आपलेपणाची जाणीव होईल आणि ते आपल्यासोबत सुखाचा अनुभव करतील. यामुळे चुकूनही आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींची टिंगल उडवू नये.


थोडे नवीन जरा जुने