असा करा सुरक्षित इंटरनेटचा वापरा

इंटरनेटचा वापर ही बाब आता खूपच कॉमन झाली आहे . असे कोणतेच क्षेत्र राहिले नाही की त्याठिकाणी नेटचा वापर होत नाही.लाईट बिल भरण्यापासून ते प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यापर्यंत सर्व कामे ऑनलाइनवर केली जात आहेत.
पूर्वी विमा हप्ता भरण्यासाठी तासनतास उभे राहवे लागत होते. आता एक क्लिकवर काही क्षणात आपण विमा हप्ता भरू शकतो. इंटरनेटचा वापर वाढल्याने कंपन्या, खासगी संस्था, सरकारी यंत्रणाही ऑनलाईन कामावर भर देत आहेत.

महत्त्वाचे जीआर किंवा एवढेच काय तर अर्थसंकल्पातील तरतुदही आपल्याला ऑनलाईन पाहवयास मिळतात . असे असले तरी इंटरनेट वापरताना आपल्या मेलवर किंवा इंटरनेट वापरावर कोणाचेही तरी लक्ष आहे , हे कळत नाही.

सायबर हल्ला करणारे यूजर्स हे आपल्या आयपी एड्रेसच्या माध्यमातून फिशिंग मेल पाठवू शकतात किंवा आपला पासवर्ड चोरून आर्थिक व्यवहार करू शकतात . अशा वेळी आपला इंटरनेटचा वापर सुरक्षित कसा राहिल, याची काळजी घ्यायला हवी .

इंटरनेट वापरताना कधी कधी यूजरचा आयपी एड्रेस आणि नाव आपल्याला माहिती न देताच घेतला जातो . त्यानंतर यूजर्सना अनावश्यक मेल आणि अन्य अडचणींचा सामना करावा लागतो . कधी कधी सायबर हल्ला होऊन आपल्या मेलमधील गुप्त माहितीही काढून घेण्याचा धोका असतो. अशा धोक्यापासून वाचण्यासाठी आपले नाव आणि आयपी एड्रेस गुप्त ठेवून नेट वापरण्याची इच्छा असेल तर 'फ्रिडम App’ आपली मदत करू शकतो.

हा App डाऊनलोड केल्यानंतर या माध्यमातून यूजर आपला आयपी एड्रेस आणि लोकेशन गुप्त ठेवू शकतो . साधारणत : कोणताही यूजर हा इंटरनेटला जोडला जातो त्याचवेळी इंटरनेट हे त्याच्या डिव्हाईसचा यूनिक आयपी एड्रेस सेव्ह करत असतो.

मात्र अशा प्रकारच्या App मुळे आणि निश्चिंतपणे इंटरनेटचा वापर करू शकतो . एवढेच नाही तर वायफायचा उपयोग करताना या App च्या माध्यमातून ट्रैफिक कोट, नाव किंवा संपर्काची सविस्तर माहिती गुप्त राहते. हा App व्हायरल प्रोटेक्शन आणि ब्राऊजिंग प्रोटेक्शनही करतो .
थोडे नवीन जरा जुने