तजेलदार त्वचा आणि डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी हे करा घरगुती उपायधकाधकीच्या जीवनात अनेक वेळा आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही, पण लहान-सहान गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आपण निरोगी राहू शकतो.
आज सर्वांचेच आयुष्य धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे. काही व्यक्तींना तर कामाशिवाय दुसर्‍या कामासाठी उसंत मिळत नाही.
अशा स्थितीत शरीराकडे फारसे लक्ष दिले जात नाही, पण काही बेसिक गोष्टींकडे लक्ष दिल्यास संपूर्ण शरीर निरोगी राहते. आपल्या आरोग्यासाठी दररोज थोडासा वेळ काढणे देखील फायद्याचे सिद्ध होते.
जाणून घ्या निरोगी शरीरासाठी काही टिप्स -

त्वचा :
त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आहारात केलेले थोडेसे बदल देखील कामाचे ठरतात. युनिव्हर्सिटी ऑफ सेंट एंड्रेजच्या एका संशोधनानुसार चकाकत्या रंगाची फळे आणि भाज्या जसे सफरचंद, पपई, टोमॅटो, सिमला मिरची खाल्ल्यास त्वचा निरोगी राहते.
डोळे :
डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खाणे एक चांगला पर्याय आहे. लिंबू, संत्रा, मोसंबी सारखी आंबट फळे वरचेवर खाल्ल्यास डोळ्यांची क्षमता वाढते. त्याचप्रमाणे डोळ्यांचा अल्ट्रावायलेट किरणांपासून बचाव होण्यासाठी गॉगलचा वापर करावा.


दात :
डॉ. युचेना योकोए यांनी केलेल्या संशोधनानुसार ही गोष्ट समोर आली आहे की दररोज दोन कप ग्रीन टी पिल्यास दातांचा पिवळेपणा, कॅविटी आणि दात सडणे अशा समस्या होत नाहीत.


नाक :
जिभेने तोंडातील वरील भागाला दाबून ठेवावे. यानंतर दोन्ही डोळ्यांमध्ये एका बोटाच्या मदतीने दबाव निर्माण करावा. असे केल्याने नाकातील समस्या कमी होण्यास मदत होते.


पाय :
पायांची मालिश करण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग म्हणजे एका टेनिस बॉलवर आपल्या पायांना रोल करावे. असे केल्याने पायातील स्नायूंना आराम मिळतो. त्याचप्रमाणे पायांना बळकटी मिळण्यात मदत होते.


कान :
अलीकडे झालेल्या एका संशोधनानुसार एअरफोनचा वापर कमीत कमी करावा. दररोज एक तासापेक्षा जास्त काळ कानात एअरफोन ठेवणे हानिकारक ठरते. त्याचप्रमाणे टीव्ही, रेडिओचा आवाज देखील कमी ठेवावा. असे केल्याने र्शवणशक्ती वाढते.


मेंदू :
दररोज दोन सफरचंदाचा ज्यूस पिल्याने मेंदू तल्लख राहण्यास मदत होते. सफरचंदाच्या रसाने मेंदूला नवी ऊर्जा मिळते त्याचप्रमाणे तो चांगल्या प्रमाणे काम करतो.


हृदय :
हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये झालेल्या संशोधनानुसार ज्या व्यक्ती सात तासांपेक्षा कमी वेळ झोपतात त्यांना हृदयविकार, हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. म्हणून हृदय निरोगी ठेवायचे असल्यास पुरेशी झोप घेतली पाहिजे.


थोडे नवीन जरा जुने