रोज करा सूर्यनमस्कार होतील 'हे' फायदे !


अ. सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.

आ. हृदय व फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.

इ. बाहू व कंबर यांचे स्नायू बळकट होतात.

ई. पाठीचा मणका व कंबर लवचिक होतो.

उ. पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्यास मदत होते.

ऊ. पचनक्रिया सुधारते.

ए. मनाची एकाग्रता वाढते.
सूर्यनमस्कार घालतांना करावयाच्या श्वसनक्रियांचे अर्थ

१. पूरक म्हणजे दीर्घ श्वास आत घेणे

२. रेचक म्हणजे दीर्घ श्वास बाहेर सोडणे

३. कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे. आंतर्कुंभक म्हणजे श्वास आत घेऊन रोखणे व बहिर्कुंभक म्हणजे श्वास बाहेर सोडून रोखणे
सूर्यनमस्कार घालतांना करावयाचे विविध नामजप

१. ॐ मित्राय नम: ।
२. ॐ रवये नम: ।
३. ॐ सूर्याय नम: ।
४. ॐ भानवे नम: ।
५. ॐ खगाय नम: ।
६. ॐ पूष्णे नम: ।
७. ॐ हिरण्यगर्भाय नम: ।
८. ॐ मरिचये नम: ।
९. ॐ आदित्याय नम: ।
१०. ॐ सवित्रे नम: ।
११. ॐ अर्काय नम: ।
१२. ॐ भास्कराय नम: ।
१३. ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नम: ।
Do this every day to benefit the sun
थोडे नवीन जरा जुने