आपल्याला दुसऱ्या बाजूने बोलणाऱ्याचा आवाज कमीच ऐकू येतो ?

बरेचदा आपण फोनवर बोलत असताना समोरच्या व्यक्तीचा आवाज खूप कमी ऐकू येतो. त्यामुळे साहाजिकच आपण आपल्या फोनच्या व्हॉल्युम वाढवतो किंवा प्रसंगी फुल करतो. इतकंच नाही तर आपल्याशी बोलत असलेल्या व्यक्तीला त्याच्या फोनच्या स्पीकरचा आवाज वाढवण्याचा सल्ला देतो.
मात्र, हे सगळे उपाय करुनही आपल्याला दुसऱ्या बाजूने बोलणाऱ्याचा आवाज कमीच ऐकू येतो. ज्यामुळे अनेकदा संभाषणामध्ये अडचण निर्माण होते. जवळपास प्रत्येकचजण या समस्येला हमखास सामोरा जात असतो.मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रीक्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा आवाज अगदी नवीन फोनसारखा स्पष्ट ऐकू येईल. बरेचदा आपल्या हातून आपल्या नकळत फोनमधील काही सेटिंग्ज चेंज होऊन जातात. ज्यामुळे आवाज कमी ऐकू येणे किंवा ऐकूच न येणे अशा समस्या उद्भवतात. मात्र, या काही छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतली तर अशा प्रॉब्लेम्सपासून आपण त्वरित सुटकारा मिळवू शकतो. जाणून घेऊया, अशाच काही साध्यासोप्या टीप्स….

एखाद्याला फोन करण्याआधी तुमच्या फोनची व्हॉल्यूम सिस्टीम बरोबर आहे का ते चेक करा. बरेचदा घाईगडबडीत आपण मिडीया व्हॉल्युमच्या जागी कॉल व्हॉल्युम कमी करतो. त्यामुळे साईड कीजचा वापर करुन सर्वप्रथम तुमचा कॉलिंग व्हॉल्युम व्यवस्थित आहे ना हे तपासा. सोबतच फोनवर बोलतेवेळी देखील आपण कॉलिंग व्हॉल्युम वाढवायला जातो पण त्याजागी मीडिया व्हॉल्यूम किंवा ‘अलार्म’ व्हॉल्युम वाढत जातो. त्यामुळे कॉलिंग व्हॉल्युम वाढूवनही तो वाढत नाही याचा अर्थ आपल्या फोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असा आपला गैरसमज होतो. त्यामुळे या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या.
थोडे नवीन जरा जुने