गरम पाण्याने अंघोळ करण्याचा 'हा' फायदा तुम्हाला माहित आहे का?

लंडन : शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम करण्यास असमर्थ असलेल्या लोकांसाठी गरम पाण्याची आंघोळ लाभदायक ठरू शकते. एका ताज्या अध्ययनातून हा दावा करण्यात आला आहे. खासकरून जास्त वजन असलेल्या लोकांना गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे सूज कमी करणे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते. 


शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, व्यायाम केल्यामुळे इंफ्लेमेटरी केमिकलची (आयएल-६) पातळी वाढू शकते. जास्त प्रमाणातील सुजेचा मुकाबला करण्यासाठी सूजरोधक घटकांच्या उत्पत्तीला ते सक्रिय करते. 

ब्रिटनमधील लॉगबरो युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ क्रिस्टॉफ अँड्रियाज यांनी सांगितले की, दीर्घकाळपर्यंत बसून काम करणाऱ्या जास्त वजनाच्या लोकांना गमर पाण्याने आंघोळ केल्यामुळे शरीराची सूज कमी करण्यासोबतच ग्लुकोज मेटाबॉलिज्म प्रक्रिया आणखी सुधारणा करण्यात मदत मिळू शकेल. 
Do you know the 'benefit' of bathing with hot water?
थोडे नवीन जरा जुने