पिवळ्या भाज्यांचं आणि फळाचं महत्त्व तुम्हाला माहित आहे का?


माणसाला फळ आणि भाज्या फिट ठेवतात. जे लोक भाज्या आणि फळे खात नाही अशा लोकांमध्ये अनेक व्याधी असल्याचं दिसंत. आजारी व्यक्तीला डॉक्टर फळाचा ज्युस पिण्याचा सल्ला देतात. किंवा ताजी फळ खाण्याचा सल्ला देतात. एका संशोधनानुसार ताटलीत 4-3 या प्रमाणात विविध रंगांच्या भाज्या आणि फळांचं सेवन करणं गरजेचं आहे. त्यातही पिवळ्या रंगाच्या फळं आणि भाज्यांचं सर्वाधिक सेवन केलं गेलं पाहिजे.

सर्व सांगतात की हिरव्या भाज्या खा, मात्र पिवळ्या भाज्या किंवा फळं खा असं कुणीही बोलत नाही. मात्र पिवळ्या भाज्या या देखील आरोग्यास खूप पोष्टिक आहे. गाजर, भोपळा, मका, सिमला मिरची, पिवळी बीट, खरबूज, केळी, आंबा, फणस असे अनेक पिवळ्या भाज्या आणि फळे आहेत.

या पिवळ्या भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये एक पदार्थ असतो. त्यामुळे त्याला पिवळा रंग येतो. तो पदार्थ आहे कॅरोटेनॉइड्स. या कॅरोटेनॉइड्समुळे पदार्थाला पिवळा रंग प्राप्त होतो. बीटा केरोटिन आणि बीटा-क्रिप्टोस्कँथिन अशा दोन घटकांपासून कॅरोटेनॉइड्स बनतात. पिवळी फळं किंवा भाज्या खाल्यानंतर या घटकांचं रूपांतर ‘अ’ जीवनसत्त्वामध्ये होतं.

पिवळी फळं आणि भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण बरंच जास्त असतं. ऑक्सिडंट्समुळे होणारं पेशींचं नुकसान अँटीऑक्सिडंट्समुळे टाळलं जातं. बीटा-क्रिप्टोस्कँथिन आणि ‘क’ जीवनसत्त्व अँटीऑक्सिडंट्स मानली जातात. यामुळे पेशींचा बचाव होतो.
पिवळी फळं आणि भाज्यांमुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. यातल्या कॅरोटेनॉइड्सचं रूपांतर ‘अ’ जीवनसत्त्वात होत असल्याने डोळ्यांचं सर्वांगीण आरोग्य राखलं जातं.

कॅरोटेनॉइड्सच्या चार प्रकारांमुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका अनेकपटींनी कमी होतो, असं हॉवर्ड मेडकल स्कूलने केलेल्या संशोधनातून समोर आलंय.

पिवळा हा तजेलदार रंग मानला जातो. विविध रोग बरे करण्यासाठी आर्ट थेरेपीचा वापर अनेक युगांपासून केला जातोय. पिवळे पदार्थ रेचक म्हणून काम करतात. तसंच पिवळ्या रंगामुळे शरीरातली विषद्रव्यं बाहेर टाकण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होते.

केळी, पिवळी भोपळी मिरची, अननस, हळद, भोपळा, मके, मोसंबी, संत्र, अँप्रकॉट, रताळं, लिंबू अशा पदार्थांचा समावेश आहारात करता येईल.

Do you know the importance of vegetables and fruits?
थोडे नवीन जरा जुने