तुम्हाला माहित आहे का?बिस्किटांवर छिद्र का असतात...


थोडीशी भूक लागलेली असो किंवा काही गोड खाण्याचं मन करत असलं तर स्वस्तात मस्त पर्याय म्हणून अनेकजण बिस्किटाचीच निवड करतात. 14व्या शतकापासून लोकं बिस्किट खात आहेत. मात्र, याच बिस्किटांवर छिद्र (होल) का असतात हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? तुम्हीही याचा कधी विचार केला नसेल. पण काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, बिस्किटांवर बारीक छिद्र (होल) नेमके कशासाठी असतात.
खरं म्हणजे बिस्किटांचा आकार हा थोडा मोठा असतो त्यामुळे ही बिस्किट सामान्यत: भट्टीत किंवा मशीनमध्ये भाजल्यास ते कच्च राहतं. त्यामुळेच त्याच्यावर छिद्र करण्यात येतात ज्यामुळे बिस्किटांवर एक डिझाइनही तयार होते.

छिद्र असलेले बिस्किट भट्टीत किंवा मशीनमध्ये टाकल्यानंतर ते पूर्णपणे फुलतात आणि चांगल्याप्रकारे भाजले जातात. ही बिस्किट चांगल्याप्रकारे भाजल्यानंतर ते भट्टीतून बाहेर काढले जातात आणि मग त्याची पॅकिंग केले जाते.जर बिस्किटांवर छिद्र केली नाहीत तर बिस्किट भाजताना ती कच्चीच राहतात आणि त्यामुळे बिस्किटांची मजाच निघून जाते. सर्वच बिस्किटांवर छिद्र असतात असे नाही तर, काही बिस्किटांवरच छिद्र असतात.
Do you know why biscuits have holes?
थोडे नवीन जरा जुने