तुम्ही तुमच्या पार्टनरच्या मिठीत झोपताय ? हे आहेत ५ फायदे


आपली पत्नी किंवा गर्लफ्रेंड आपल्या मिठीत झोपते किंवा तसे झोपण्याची तुमच्याकडे मागणी करते काय ? तसेच, तुम्ही महिला असाल तर तुमचा पती किंवा बॉयफ्रेंडही तूमच्याकडे तशी मागणी करतो काय ? तसे होत असेल तर चांगलेच आहे. 

उलट तुमच्या पार्टनर सोबत तुम्ही तसे झोपत नसाल तर, त्यात लवकरच बदल कारा. पार्टनरच्या मिठीत झोपण्यास सुरू करा. हे वाचून कदाचीत तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु, पार्टनरला मिठी मारून झोपन्याचे फायदे जर तुम्ही जाणून घेतले. तर तूम्हाला हे अधिक पटेल. म्हणूनच जाणून घ्या पार्टनरला मिठी मारून झोपन्याचे ५ फायदे…

चांगली झोप मिळते

एका सर्वेनुसार जे पती-पत्नी जर एकमेकांना मिठीत घेऊन झोपतात त्यांची झोप चांगली होते. त्यांना एकटेपणा वाटत नाही. तसेच दूसऱ्या दिविशी त्यांना नेहमीच्या तुलनेत अधिक ताजेतवाणे वाटते.

जास्त काळ टिकून राहीलेली वेदना दूर होते

जे कपल एकमेकांवर प्रेम करते आणि ते एकमेकांच्या बाहूपाशात झोपते त्यांच्यतील वेदना इतरांच्या तुलनेत कमी होते. ज्यांना डोकेदूखी, पाठदूखीचा त्रास आहे, अशा मंडळींनी हा प्रयोग करून पहायला हरकत नाही.

चिडचिडेपणा कमी होतो

याबाबतही एक सर्वे झाला असून, या सर्वेनुसार एकमेकांच्या मिठीत झोपणाऱ्या कपलमध्ये तसेच त्या व्यक्तिंमध्ये चिडचीडेपणा कमी असतो. हे केवळ पती-पत्नीमध्येच होते असे नव्हे, तर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्येही असे होते.

तणावापासून मुक्ती

आपल्या प्रिय व्यक्तिच्या बाहूपाशात झोपल्याने आपल्याला तणावापासून मुक्ती मिळते. दिवसभर किंवा रात्रभराच्या कामाचा ताण जाऊन शीण हलका होतो. आजकाल विज्ञानही हे मानू लागले आहे की, झोपताना आपल्या मनातील गोष्ट जर कोणी ऐकली तर मनावरचा ताण हलका होतो.

बुद्धी तल्लख होते

मिठी मारून एकत्र झोपण्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे. जे लोक मिठी मारून एकत्र झोपतात. त्यांची बुद्दी इतरांच्या तुलनेत तल्लख असते, असे एका सर्वेनुसार सिद्ध झाले आहे. अनेक मानसशात्रज्ञही याला दुजोरा देतात

थोडक्यात पण महत्त्वाचे

खरेतर माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे त्याला एकटे राहणे आवडत नाही. तरीही आजच्या गर्दीच्या जगात मानूस स्वत: एकटाच राहतो. काळानुसार बदललेली जिवनशैली त्याला कारणीभूत आहे. असे असले तरी मनातली गोष्ट शेअर करण्यासाठी एखादी व्यक्ती कोणत्याही मानसाच्या आयुष्यात आली तरी त्याच्या अमुलाग्र बदल होऊ शकतो.थोडे नवीन जरा जुने