सकाळी-सकाळी दिवसाची सुरवात चांगली व्हावी अस वाटतंय ? मग हे वाचा..
स्त्री असो किंवा पुरुष, दोघांसाठी सकाळची सुरुवात चांगली असेल तर दिवस सुखात आणि शांततेत पार पडतो. यामुळे सकाळी-सकाळी दिवसाची सुरवात खराब होईल असे कोणतेही काम करू नये. जर असे काही घडले तर दिवसभर आपल्या स्वभाव आणि कामावर याचा वाईट प्रभाव राहील. येथे जाणून घ्या, सकाळी-सकाळी कोणकोणते पाच कार्य करू नये.

उशिरापर्यंत झोपू नये -


सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी अंथरून सोडावे. शास्त्रानुसार सकाळी लवकर झोपेतून उठणार्‍या व्यक्तीवर सर्व देवी-देवतांची कृपा राहते, तेच आरोग्यासाठीसुद्धा हे वरदान आहे. जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपतात, ते आळशी बनतात. यामुळे दिवसभर काम करण्यात उत्साह राहत नाही. सकाळी उशिरापर्यंत झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. लठ्ठपणाची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे सकाळी-सकाळी लवकर झोपेतून उठावे.

खोटं बोलू नये -

ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे की, कधीही खोटं बोलू नये, परंतु बहुतांश लोक खोटं बोलतत. कमीतकमी सकाळी-सकाळी तरी खोटं बोलू नये. जर दिवस्ची सुरुवात खोट्या गोष्टीने झाली तर दिवसभर खोटे बोलत राहवे लागते. खोटं बोलणे पाप मानण्यात आले आहे. यापासून दूर रहावे. दिवसाची सुरुवात सत्याचे आचरण करत व्हावी. सत्याचे आचरण म्हणजे नेहमी खरे बोलावे.


क्रोध करू नका -

क्रोधाला मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानण्यात आले आहे. या अवस्थेत करण्यात आलेल्या कामामुळे फक्त अडचणींच निर्माण होतात. जर दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्याला राग आला तर दिवसभर स्वभात चिडचिड राहते. रागामध्ये व्यक्ती चांगल्या-वाईट गोष्टींमधील फरक समजू शकत नाही, वाणीवर नयंत्रण ठेवू शकत नाही. कधीकधी तोंडातून असे शब्द बाहेर पडतात, ज्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळी-सकळी थोडा वेळ योग-प्राणायाम करावा.


वाद-विवाद करू नये

सकाळी झोपेतून उठताच जोडीदारासोबत किंवा घरातील इतर कोणत्याही सदस्यासोबत वाद घालू नका. कुटुंबाशी प्रसन्न मनाने भेटा. जर सकाळपासूनच घरात कलहाचे वातावरण असेल तर दिवसभर याचा तणाव शरीर आणि मनावर राहतो. आपण स्वतः दुःखी राहतो आणि कुटुंबातील सदस्यही.


कोणाचाही अपमान करू नका

सकाळच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्यांशी आदराने वागावे. विशेषतः आई-वडिलांच्या संदर्भात ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवावी. कुटुंबात कधी-कधी अशा गोष्टी घडतात, ज्यामुळे नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. अशा स्थितीमध्ये कोणाचाही अपमान करू नये. कुटुंबात दिल्या गेलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे दोन्ही व्यक्तींना खूप त्रास होतो. सकाळी-सकाळी असे घडले तर दिवस खराब जातो.
थोडे नवीन जरा जुने