मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे करा फायदा होईलएक वेळा मेंदूवर नियंत्रण मिळवल्यास आरोग्यासंबंधी अर्धे काम फत्ते झाल्याप्रमाणे आहे. अनेक वेळा निरोगी आरोग्यासाठी तुम्ही काही तरी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अनेकवेळा मेंदू दगा देतो. काही सोप्या पद्धतीचा वापर करून मेंदूला कसे नियंत्रणात ठेवता येईल हे संशोधकांनी शोधून काढले आहे.

भूक कमी लागेल


जास्त खाण्याच्या सवयीमुळे तुमचे वजन वाढत असल्यास अशावेळी फक्त पदार्थांचा स्वाद घ्या. असे केल्याने मेंदूला तुम्ही तो पदार्थ खाणार असल्याचा संदेश मिळेल. यानंतर तो पदार्थ खाल्ला नाही तरी तुमचा मेंदू पुढील काही तासांसाठी जेवणाची मागणी करणार नाही. पेनसिल्विनिया विद्यापीठात झालेल्या एका संशोधनानुसार अशा पद्धतीने मेंदूला चकवा देत न खाण्याची सवय लठ्ठपणा कमी करण्यात महत्त्वपूर्ण ठरू शकते.


अतिरिक्त ऊर्जा मिळेल
दिवसभर काम केल्यानंतर थकवा वाटत असल्यास खडबडीत रस्त्यावर पंधरा मिनिटे चालल्यास शरीरात अतिरिक्त ऊर्जा निर्माण होऊ शकते. संशोधनात हे सिद्ध झाले आहे की असे केल्याने रक्तसंचार वेगाने वाढतो. त्याचप्रमाणे शरीराला जास्त ऊज्रेची गरज असल्याचा संदेश मेंदूला मिळतो. परिणामी शरीराला जास्त ऊर्जा देण्याचा प्रयत्न मेंदूकडून केला जातो.


प्रेरणा मिळेल
फ्रान्सच्या स्पोर्ट्स सायकोलॉजिस्टनुसार जर तुम्ही व्यायाम करण्यासाठी जाता आणि मेंदू यासाठी साथ देत नसल्यास तर आता फक्त 15 मिनिटे व्यायाम करणार असा विचार करा. यामुळे मेंदूला हा संदेश मिळतो की 15 मिनिटांपेक्षा जास्त व्यायाम करायचा नाही त्यामुळे तो व्यायामासाठी साहाय्य करतो आणि तेवढय़ा काळासाठी उत्साह वाढतो.


स्मरणशक्ती वाढते
डॉ. कायंथिया ग्रीन यांच्या मते अनेकवेळा असे होते की एखाद्या व्यक्तीशी झालेल्या अल्पकाळाच्या भेटीनंतर त्या व्यक्तीचे नाव विस्मृतीत जाते. यापासून वाचण्यासाठी जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तेव्हा त्याचे मोठय़ाने नाव घेऊन त्याचे स्वागत करा. यानंतर त्याच्याशी बोलताना मनात त्याचे नाव आठवावे. असे केल्याने तुम्ही त्या व्यक्तीचे नाव कधी विसरणार नाहीत.


प्रत्येक गोष्ट लक्षात राहील
हेन्री फोर्ड हॉस्पिटलचे डॉ. ग्रे रिचर्डसन यांच्या मते कोणत्याही परीक्षेच्या किंवा मुलाखतीच्या आदल्या रात्री त्याच्यासंबंधित गोष्टी आठवत झोपले पाहिजे. असे केल्याने मेंदू डोळ्यासमोर त्या गोष्टी दृश्य स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतो आणि ते जास्त काळ स्मरणात राहतात.थोडे नवीन जरा जुने