"ह्या" गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष नाहीतर तरुण वयातच म्हातारे व्हाल !


वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु अनियमित जीवनशैलीमुळे अवेळी प्रौढावस्था येत आहे. मात्र, याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. आपण लवकर वयस्क होत आहोत याची लक्षणे शरीरातील अवयवांतून वेळोवेळी दिसत असतात. पाहूयात ते कसे संकेत देतात.
मेंदू :

चाचणी : 100 पासून अंकांची उलट गणना करा आणि याच्यासाठी किती वेळ लागला याची नोंद करा. हे लहान मुलांच्या खेळासारखे वाटेल, पण याच्यामुळे मेंदूची कार्यक्षमता किती आहे याचा अंदाज येईल.
- 20 सेकंद (वय 30 ते 40) सामान्य
- 40 सेकंद (वय 40 ते 60) सध्याच्या वयापेक्षा दोन वर्षे जास्त
- 60 सेकंद ?वयापेक्षा चार वर्षे जास्त

असे का : मेंदू लाखो पेशींपासून तयार झालेला असतो. वयासोबत पेशी नष्ट होण्यास सुरुवात होते आणि विचार करणे, आठवणीत ठेवण्याची क्षमता कमकुवत होऊ लागते.

काय करावे : दररोज 30 मिनिटे एरोबिक एक्झरसाइज केल्याने मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळतो.


फुप्फुसे :

चाचणी : दीर्घ श्वास घेऊन एक सामान्य आकाराचा फुगा फुगवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर फुग्याची लांबी मोजा.

8 सेंटिमीटर - वयापेक्षा पाच वर्षे जास्त
12 ते 13 सें.मी. - वयापेक्षा तीन वर्षे जास्त
14 ते 16 सें.मी. - सामान्य

असे का : वय वाढण्यासोबत फुप्फुसाची लवचीकता कमी होत जाते आणि त्याची कार्यक्षमता कमी होते. निरोगी फुप्फुसात 3.6 लिटर हवा भरण्याची क्षमता असते.
काय करावे : वजन आटोक्यात ठेवावे, वजनाचा फुप्फुसावर दबाव पडू नये.


स्नायू :

चाचणी : एका पायावर उभे राहत (जोपर्यंत शक्य होते) दुसरा पाय मागे वाकवा. दोन्ही हात मागील बाजूस ठेवून डोळे बंद करून उभे राहा. तुम्ही या अवस्थेत किती वेळा राहू शकता.

1 मिनिट - सामान्य
30 सेकंद - वयापेक्षा दोन वर्षे जास्त
30 सेकंदांपेक्षा कमी - वयापेक्षा तीन वर्षे जास्त

असे का : वयासोबत पायाकडील स्नायू कमकुवत होऊ लागतात. ज्यामुळे जोडांच्या हालचालीवर नियंत्रण राहत नाही आणि संतुलन बिघडते.
काय करावे : नियमित व्यायामासोबत दररोज एका पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा.


त्वचा : टेबलावर हात ठेवून दुसर्‍या हाताने त्वचा चिमटीत धरा (जेवढा वेळ धरता येईल तेवढी) त्वचा किती वेळात सामान्य होते ते पाहा.
1 ते 2 सेकंद - सामान्य
03 ते 4 सेकंद - वयापेक्षा एक वर्ष जास्त
05 ते 6 सेकंद - वयापेक्षा दोन वर्षे जास्त

असे का : वयाबरोबर त्वचेतील लवचीकपणा कमी होतो, परंतु सूर्यप्रकाशात जास्त काळ राहिल्याने वेळेआधी त्वचेची लवचीकता कमी होते. चेहर्‍यावर सुरकुत्या येण्यालादेखील हे कारणीभूत ठरतात.
काय करावे : त्वचेचा प्रखर उन्हापासून बचाव करावा. सनस्क्रीन क्रीम लावून बाहेर उन्हात फिरावे.


हृदय
चाचणी : कंबरेच्या घेराला नितंबाच्या घेराने भागावे. येणारा भागाकार किती आहे.
0.7 पेक्षा कमी - सामान्य
0.85 वयापेक्षा - तीन वर्षे जास्त
0.85 पेक्षा जास्त - पेक्षा जास्त वयापेक्षा पाच वर्षे जास्त

असे का :वाढलेली कंबर मधुमेह, उच्च् रक्तदाब आणि हृदयरोग यांचा इशारा देते. कंबरेचा वाढलेला घेर हृदयासाठी धोकादायक असतो.
काय करावे : संतुलित आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा.
35 वर्षांनंतर खांद्याच्या जोडांमधून आवाज येणे वाढत्या वयाची लक्षणे आहेत, परंतु ही लक्षणे लवकर दिसायला लागली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

10 टक्के लोकांना जबड्यातील हाड दुखण्याचा त्रास होतो. बोलताना जबड्यातील हाड आणि कवटीच्या मध्ये कार्टिलेज परत आपल्या स्थितीत येत असतो तेव्हा आवाज निर्माण होतो.
Don't neglect "these" things, or you'll get old at a young age!
थोडे नवीन जरा जुने