"ह्या" कारणांमुळे लग्नानंतर महिलांची तब्येत वाढते...

लग्नानंतर महिलांची तब्ब्येत अधिक होते असे तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलही असेल. मात्र, यासंदर्भात तुम्ही कधी विचार केला आहे का? की लग्नापूर्वी सडपातळ असलेल्या मुली लग्न झाल्यानंतर का जाड्या होतात?. आज आम्ही तुम्हाला आच संदर्भात काही सांगणार आहोत. 


यासंदर्भात एक्सपर्ट्सचे मानने आहे की, लग्न झाल्यानंतर मुलींची लाइफस्टाइल बदलते, त्यांच्या जबाबदारी वाढतात आणि याचा एकूणच परिणाम महिलांवर होतो. पाहूयात महिलांची तब्येत होण्यामागे नेमकं काय कारण आहे ते…

लग्न झाल्यानंतर महिलांना विविध ठिकाणी फिरण्याची खुप इच्छा असते आणि यासोबतच विविध पदार्थ खाण्याचीही त्यांना आवड असते. लग्नानंतर अनेकजण विविध ठिकाणी फिरण्यास जात असतात तसेच विविध ठिकाणचे निरनिराळे पदार्थ खात असतात यामुळेही अनेक महिलांची तब्येत होते.

लग्न झाल्यानंतर स्त्रियांची जबाबदारी खुप वाढते. रात्री उशीरा झोपतात आणि सकाळी लवकर उठतात यामुळे त्यांची झोपही पूर्ण होत नाही. यामुळेही महिलांची तब्येत होते असे म्हटले जाते. लग्नानंतर जेवढी जबाबदारी वाढते तेवढाच ताण-तणावही वाढत जातो यामुळे अनेकदा शरीरात असे काही हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे महिलांची तब्येत होते.

Due to "these" reasons, women's health increases after marriage
थोडे नवीन जरा जुने