अनुशपोटी तुळशीची 5 पाने रोज चाऊन खा, फायदे पाहून तुम्हालाच धक्का बसेल


तुळशीचे चार भिन्न जाती उपलब्ध आहेत. श्वेत तुळस (आपली नेहमीची, हिरव्या रंगाची पानं असलेली), कृष्ण तुळस (याची पाने थोडी निळसर छटेची असतात) कर्पूर तुळस (याच्या पानांना कापराचा वास येतो) आणि रान तुळस. तुळशीची पानं, मुळं आणि बिया औषधी गुणधर्मांनी युक्त आहेत. पानांचा विशेष वापर सांगितला आहे.


तुळशीचे औषधी उपयोग खालीलप्रमाणे- 

ताप ,वारंवार होणारी सर्दी, दमा, छातीत कफ साठणे इ. मध्ये तुळस उपयोगी आहे. जुनाट सर्दी, बारीक कणकण सतत राहणे, सारखे आजारी पडणे, प्रतिकारशक्ती कमी असणे, अशा वेळेस तुळस खावी. चांगला फायदा होतो. डेंग्यू, मलेरियासारख्या तापांमध्येही ताप उतरविण्यासाठी तुळस उपयोगी आहे. लहान मुलांमध्ये सर्दी, ताप आणि जंतामुळे पोटदुखी वारंवार होते. या तिन्ही आजारांवर तुळस उत्तम. रोज तीन ते पाच तुळशीची पाने सकाळी अनुशपोटी चावून खावीत. याने पोटातील जंतही कमी होण्यास मदत होते.

सर्दी, खोकला, दमा तीव्र वेगावस्थेत अन्य औषधोपचार करावेत पण, त्याची प्रखरता, तीव्रता आणि नियमितता कमी करण्यासाठी रोज मध आणि तुळस खायला द्यावी. ऋतू बदलताना होणार्या त्रासासाठी घरगुती काढे तयार केले जातात. अशा काढ्यांमध्ये तुळस अवश्य घालावी. चांगला फायदा होतो. तुळशीचा वापर पावसाळ्यात नियमित करावा. काढ्यातून किंवा चहामध्ये तुळशीची पाने घालावीत आणि ते प्यावे. पावसाळ्यात स्वाभाविकत: शारीरिक प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि रोगराई वाढलेली असते तेव्हा आजारी पडण्यापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुळस अवश्य वापरावी. याचा लेप, आभ्यंतर पान(खाणे किंवा पिणे) आणि वाफारा घेणे अशा विविध पद्धतींनी वापर करावा.

तुळशीचा ऍण्टी-ऑक्सिडंट हा गुण त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी उपयोगी आहे. त्वचा शुद्ध करणे, स्वच्छ करणे आणि निरोगी करणे या तिन्ही गोष्टी तुळशीने शक्य आहेत. तारुण्यपिटिका आणि तेलकट त्वचा असल्यास तुळस वापरावी. तेलकट त्वचेमुळे तारुण्यपिटिका वारंवार येतात. ते आकाराने मोठे, दुखणारे आणि पूयुक्त असतात. अशा प्रकारच्या तारुण्यपिटिकांवर तुळशीचा लेप (पानांचा) लावावा. त्याचबरोबर गुळवेल, निम्ब आणि हळदही वापरावी. या सर्व घटकांचा पॅक चेहर्यावर लावावा. १५-२० मिनिटे ठेवावा. वाळल्यावर धुवून टाकावा. नियमित वापराने त्वचेवरील तेलीय अंश कमी होतो. आज तारुण्यपिटिका येण्याचे प्रमाण खूप कमी होते. त्याचबरोबर त्वचेवर एक तुकतुकी येते.

ऍण्टीबॅक्टेरियल, ऍण्टीफंगस (जंतुघ्न), ऍण्टीपॅरेटिक (ताप कमी करणारे), ऍण्टीकॅन्सर (कॅन्सरप्रतिरोधक), ऍण्टीसेप्टीक (चिघळलेली जखमभरून काढण्यासाठी उपयोगी) आणि ऍण्टी-ऑक्सिडंट (त्वचेसाठी उपयोगी) तुळशी आभ्यंतरचा जंतू नष्ट करण्यासाठी तर खूप चांगला फायदा होतोच. त्याचबरोबर परिसरातील जंतुंनाही नष्ट करण्यास उपयोग होतो. जिथे तुळशीचे रोप आहे, तिथे डास व अन्य कीटक कमी येतात.

सर्व त्वचारोगांमध्ये, ज्यात स्राव आहे, कंड आहे, पू झालाय, जखमलवकर भरत नाही, अशा सर्व रोगांमध्ये तुळशीचा उपयोग होतो. चामखीळ, मस मध्ये लावावे. नियमित वापराने तो मस, चामखीळ छोटा होऊन निघून जातो.

तणावाचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे. ताणामुळे विविध आजार लवकर जडतात. जसे मधुमेह, उच्च रक्तचाप (High BP ) यावर फक्त मधुमेहासाठी किंवा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी औषध योजना करणे पुरेसे नाही. या आजारांचे मूळ जर ताणतणावात असेल, तर ते कमी करण्याची गरज अधिक आहे. ताणतणाव कमी झाला की, त्याच्यामुळे उद्भवलेले आजारही नियंत्रित राहतात. (म्हणून सकाळ, संध्याकाळ तुळशी वृंदावनाभोवती प्रदक्षिणा मारण्यास सांगितली असावी.) तुळशीच्या परिसरातील हवा तर शुद्ध आहेच, त्याचबरोबर त्याच्या स्पर्शाने वासाने आणि सेवनाने ताणावरही चांगला परिणाम होताना दिसतो.

तुळशीपत्र अधिक औषधी आहेत. घरगुती उपयोग नक्की करून पाहावेत. खोकला असल्यास तुळस (पानांचा रस) आणि मध येता जाता चाटावे. खोकल्याची उबळ कमी होते. मधामुळे चिकट कफही निघण्यास मदत होते. जंतुघ्न असल्यामुळे चिघळलेली सर्दी, पिवळा कफ इ. त्रासही कमी होतात. ताप कमी होऊन प्रतिकारशक्ती वाढते. तुळशीच्या पानांचा रस आणि काळीमिरी (थोड्या प्रमाणात) याचा वापर करतात. ताप, डोकेदुखी, घसा बसणे, फ्लू, छातीत कफ होणे इ. वर अति उपयोगी आहे. 

विषमज्वरातही उपयोगी आहे. वरील काढा रोज प्यायल्याने डेंग्यूनंतर लवकर बरे होण्यास फायदा होतो. तसेच ते पू निर्मिती कमी करतो. तुळस, काळीमिरी आणि आलं यांचा एकत्रित वापर विविध आजारांमध्ये सांगितला आहे. पण, पित्तामुळे होणार्या त्रासांमध्ये हा योग टाळावा. आल्यामुळे पोटाच्या तक्रारी आटोक्यात राहतात आणि पचन सुधारते. भूक मंदावली असल्यास ती वाढते. काळीमिरीमुळे कफाच्या विविध आजारांवरही मात करता येते. तुळशीचा वापर क्षयरोगातही उत्तमहोतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यास याची मदत होते. तुळसीचा रस आणि मध यांचा वापर डोळ्यांसाठीही उत्तमआहे.
तुळशीच्या बिया पाण्यात भिजत ठेवाव्यात. नंतर ते पाणी प्यावे. याने मूत्रप्रवृत्ती संबंधीचे त्रास नाहीसे होतात. 

(अडखळत मूत्र प्रवृत्ती होणे, वारंवार थोडी थोडी होणे इ.) यामुळे मूतखडा असतेवेळी तुळशीचा फायदा होतो. मुखदुर्गंधी असतेवेळी तुळशीची पाने चावून खावीत. याने दातांचे आरोग्यही सुधारते आणि हिरड्याही निरोगी राहतात. 

वाहणार्या जखमा आणि अन्य त्वचाविकारांवर मुळ्याचा रस लावावा (तुळशीचे मूळ घासून ते गंध लावावे) फायदा होतो. जुनाट जखमही या लेपाने भरून येते.अंगावर पित्ताच्या गांधी आल्या असतील तर पानांचा रस चोळावा. त्यामुळे खाज आणि आग कमी होते.
थोडे नवीन जरा जुने