नाष्ट्यात एक वाटी मोड आलेले कडधान्य खा आणि पहा परिणामनाष्ट्यात एक वाटी मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) खाल्ल्यास व्यक्तीला दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा आणि पोषण मिळते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये पोषक घटक दुप्पट प्रमाणात असल्याने हे खाल्ल्याने व्यक्तीला जास्त स्फूर्तिदायक वाटते. तसेच यात तेल किंवा मसाल्यांची देखील गरज लागत नाही. म्हणून हे आरोग्यासाठी हितकारक आणि उपयोगी ठरते.

काय-काय असावे

मोड आलेल्या कडधान्यामध्ये अनेक प्रकारच्या धान्यांचा समावेश करता येतो, परंतु आहारतज्ज्ञानुसार हरभरा, भुईमूग, मसूर, मूग, मटकी इत्यादींचा समावेश केला पाहिजे. या धान्यात मोठय़ा प्रमाणात पोषक घटक असतात. जे व्यक्तीसाठी फायदेशीर असतात.


प्रौढत्वाचा वेग कमी
मोड आलेल्या कडधान्यामध्ये अँटीऑक्सीडंट आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. अँटीऑक्सीडंटमुळे प्रौढ होण्याचा वेग कमी होतो. यातून शुद्ध स्वरूपात मिळणार्‍या प्रोटीनमुळे स्नायू बळकट आणि सूडौल होतात.


100 पट जास्त एंझाइम्स

कच्ची फळे आणि पालेभाज्यांच्या तुलनेत मोड आलेल्या आहारामध्ये 100 पट जास्त एंझाइम्स असतात. एंझाइम्स शरीराच्या विकासासाठी मदतीचे असतात. हे इतर खाद्यपदार्थांतील जास्तीत जास्त व्हिटॅमिन्स, खनिज तत्त्वे, फॅटी आणि अमिनो अँसिड शोषण्यात मदत करतात.


व्हिटॅमिन्समध्ये होते वाढ

मोड आलेल्या आहारामध्ये असणार्‍या व्हिटॅमिन्सची उपयोगीता 20 पटींनी जास्त वाढते. मुगामधून व्हिटॅमिन बी 1, 285 टक्के, व्हिटॅमिन्स बी 2, 515 टक्के आणि नियासीन 256 टक्क्यांपर्यंत वाढते.


हे देखील महत्त्वाचे

मोड आलेले अन्न शिजवून खाण्यापेक्षा कच्चे खाणे कधीही चांगले. शिजवल्याने त्यामधील पोषक घटक नष्ट होण्याची शक्यता जास्त असते. असे झाल्यास स्प्राउट्स खाण्याचा फायदा होत नाही.


मोड आलेल्या आहाराचा फायदा
अशा आहारामध्ये मुबलक प्रमाणात ऑक्सीजन असते. निरोगी राहण्यासाठी हे ऑक्सीजन उपयुक्त ठरते.
थोडे नवीन जरा जुने