दररोज खा पनीर आणि मिळावा हे फायदे
असे म्हटले जाते की, व्यक्तीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक द्रव्ये दुधामध्ये आहेत. मात्र, तुम्हाला दूध आवडत नसेल तर पनीरपेक्षा उत्तम तुमच्यासाठी दुसरे काहीच असू शकत नाही.

भारतीय व्यंजनांमध्ये पनीर स्वादच नव्हे तर आरोग्याचाही पर्याय बनलेला आहे. आज अनेक प्रकारचे चीज बाजार उपलब्ध आहेत, परंतु पनीर म्हणजेच कॉटेज चीज सर्वांपेक्षा वेगळे आहे. एक नजर टाकून पनीरच्या पोषक द्रव्यांवर..


1. कॅल्शियमचा स्रोत
पनीर कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. याच्या नियमित सेवनाने दात आणि हाडे मजबूत राहतात. यामध्ये लॅक्टोज खूप कमी प्रमाणात असते. त्यामुळे दातांना गोड पदार्थांपासून होणारा धोकाही राहत नाही.

2. भरपूर ‘ड’ जीवनसत्त्व
कॅल्शियमव्यतिरिक्त पनीरमध्ये मोठय़ा प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व आढळून येते. हे दातांच्या मुळापर्यंत घर बनवणार्‍या जंतुंची किंवा कॅव्हिटिजची सुटका करण्यास सक्षम आहे. याचे नियमित सेवन केल्याने आपल्या दातांचे आरोग्य टिकून राहते.


3. वजन वाढते
ज्यांचे वजन कमी आहे त्यांनी विशेषत्त्वाने पनीरचे सेवन केले पाहिजे. यामध्ये असलेली प्रथिने, फॅट आणि मिनरल वजन वाढवण्यास मदत करतात. तसेच प्रथिने व्यक्तीला कर्करोगाच्या धोक्यांपासूनही दूर ठेवतात.


4. आणखीही आहेत फायदे
पनीरचे नियमित सेवन केल्याने रक्त वाढते, लिव्हर मजबूत राहते आणि व्यक्तीला पोषक द्रव्ये शोषून घेण्याची ताकद मिळते.
पनीर इन्सुलीन रेझिस्टंस सिंड्रोम विकसित होऊ देत नाही.
वाढत्या वयासोबत उद्भवणार्‍या समस्यांपासून बचाव करण्यात पनीरची महत्त्वाची भूमिका आहे.
पनीरच्या नियमित सेवनाने पाठ आणि सांध्यांशी संबंधित त्रास होत नाही.


थोडे नवीन जरा जुने