दररोज सकाळी बदाम खाल्याने शरीरात होतील 'हे' आरोग्यवर्धक बदल
सकाळी उठून भिजलेले बदाम खाण्याचा सल्ला तर नेहमीच दिला जातो. बदामाचे नियमित सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो हे वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
जाणून घ्या बदाम खाण्याचे इतर फायदे...


हृदयविकाराचा झटका

लोमा लिंडा स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (यूएसए) च्या मते, जे लोक आठवड्यातून पाच वेळा बदामाचे सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 50 टक्क्यांपर्यंत कमी होतो. बदाम कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित ठेवतात. तसेच बदामाच्या आवरणात असलेले फ्लेव्हनॉइड्स विविध रोगांपासून हृदयाचे संरक्षण करतात, असे टफ्ट्स विद्यापीठातर्फे करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आले आहे.


हाडे मजबूत होतात

बदामात असलेले फॉस्फरस हाडे आणि दातांना बळकट बनवते. तसेच हाड आणि दातांशी संबंधित आजार होण्याचा धोकासुद्धा कमी होतो. दातांसाठी आवश्यक असणारे फॉस्फरस बदामातून पुरेशा प्रमाणात मिळते.


वजन कमी करण्यास सहायक

एका संशोधनानुसार जे लोक आठवड्यातून दोन वेळा बदाम खातात ते बदाम न खाणार्‍या लोकांच्या तुलनेत 31 टक्क्यांपर्यंत सडपातळ असतात. बदामात असलेल्या डायटरी फायबरमुळे असे होते. हा घटक वजन वाढण्यास प्रतिबंध करत असतो.

मधुमेह झाल्यास फायदेशीर

जेवणानंतर रक्तात वाढणारी साखरेची पातळी कमी करण्याची ताकद बदामात आहे. याशिवाय यामध्ये ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेशी संबंधित आजारांमध्ये फायदा मिळतो.


रात्री पाण्यात भिजवून ठेवलेले बदाम सकाळी सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. भिजलेल्या बदामातून निघणारे एंझाइम त्यातील फॅट पचवण्यास मदत करते.


13 टक्के प्रथिने असतात बदामात
25 टक्के कॅल्शियम आणि 20 टक्के लोह बदामात असते.


20 अँटिऑक्सिडंट्स फ्लेव्हनॉइड्स बदामाच्या आवरणात असतात .
04 वर्षांपर्यंत बदाम सुरक्षित राहतात, फक्त ते हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवावेत.थोडे नवीन जरा जुने