जास्त काम केल्यानेही वाढू शकतो नैराश्याचा धोका !


लंडन : काही महिला सतत काही ना काही काम करत असतात. मात्र कामात असे जुंपून राहण्याची ही सवय त्यांच्यासाठी भारी पडू शकते. एका नव्या अध्ययनात असे दिसून आले आहे की, आठवडाभरात ५५ तासांपेक्षा जास्त काम केल्यामुळे महिलांमध्ये नैराश्याचा धोका वाढू शकतो.

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये या मनोविकाराचा धोका फारसा जास्त दिसून आला नाही. ब्रिटनमधील क्वीन मेरी युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यात २० हजार प्रौढ लोकांचा समावेश करण्यात आला होता.


त्यांच्यावर केलेल्या अध्ययनाआधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मानक निकषांनुसार, आठवड्यात ३५ ते ४० तास काम करणाऱ्या महिलांच्या तुलनेत जास्त तास काम करणाऱ्या महिलांमध्ये नैराश्याची लक्षणे ७.३ टक्के जास्त आढळून आली.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, आठवडाभरात केलेल्या कामाचा संबंध महिला आणि पुरुषांमध्ये नैराश्याच्या अधिक धोक्यासोबत दिसून आला. आठवडाभरात जास्तीचे काम करणाऱ्या पुरुषांमध्ये नैराश्याची लक्षणे ४.६ टक्के वाढलेली दिसून आली. महिलांपेक्षा ती कितीतरी कमी आहेत.

Excessive workload can also increase the risk of depression
थोडे नवीन जरा जुने