सकाळपासूनच करा 'ही' कामे आणि तणावमुक्त रहा
नित्यक्रमाचे पालन करावे -

जीवनात नेहमी एका नित्याक्रमाचे पालन करावे. जेव्हा आपल्या दिवसाचे नियोजन केलेले असते तेव्हा आपला दिवस चांगला वापरू शकतो. आपणास हे देखील लक्षात येईल की तुमची सर्व काम वेळेत पूर्ण होऊन तुमच्याकडे स्वतःसाठी वेळ आहे की ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम बनाल.

सकाळी लवकर उठावे


तुम्ही रात्री जेवढ्या लवकर झोपी जाल सकाळी तेवढ्या लवकर उठाल की ज्यामुळे तुम्ही दैनिक कामे वेळेवर पूर्ण कराल. तसेपन लवकर झोपून लवकर उठणारा व्यक्ती श्रीमंत आणि बुद्धिमान बनतो.


स्वतःसाठी एक यादी बनवावी

त्या गोष्टींची एक यादी बनवावी की ज्या तुम्हाला आनंदी आणि आशादायक बनवतील. हे तंत्र तुमच्या तणावाला सकारात्मक पद्धतीने कमी करण्यासाठी मदत करते.सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे एक काम करण्याची यादी बनवावी ज्यामुळे सर्व काम वेळेत पूर्ण होतील. हे लक्ष केंद्रित करण्याचा चांगला मार्ग आहे.

तुम्ही संकटांचा स्वीकार करून त्यांचा सामना करावा-

जर तुम्ही कोणत्या वाईट परिस्थितीत असाल किंवा तुमचा एखादा निर्णय तुम्हाला तिकडे घेऊन गेला असेल तर त्यावेळी पळवाटा शोधण्यापेक्षा किंवा त्यांना घाबरण्यापेक्षा त्यांचा सामना करावा. जेव्हा तुम्ही संकटांचा स्वीकार करता तेव्हा तुमचं डोकं आणि विचारक्षमता यांवर सकारात्मक परिणाम दिसून येतो. हे तुम्हाला भविष्यात कठीण काळात लढण्यासाठी मजबूत बनवते.

शरीराला आराम द्यावा

आपल्या शरीराला आणि मनाला आराम देणं हा तणावमुक्त राहन्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. लगातार काम केल्यामुळे तुमचे शरीर आणि डोकं तणावपूर्ण होत म्हणून कामात काही वेळ विश्रांती घेणं गरजेचं आहे. यामुळे तुम्ही शांत राहाल व तुम्हाला चांगला वाटेल.

उशीर करू नये-

जसे की मोठ्यांनी व्यक्तींनी सांगितल आहे उद्या केव्हाही येत नाही. आपले काम उद्यावर न ढकलता लवकरात लवकर पूर्ण करावे. आजच काम उद्यावर टाकल्यामुळे जीवनात खूप तणाव वाढतो. तुम्ही तुमचे काम जेवढे लवकर पूर्ण कराल तेवढा तुम्हाला आनंद भेटेल.सर्वात महत्त्वाची गोष्ट-


शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी आनंदी राहा. आनंदी राहणं म्हणजे तुमच्या शरीराला आनंदी ठेवणे. यासाठी नियमित व्यायाम करावा.नियमित व्यायाम शरीरासाठी एक चांगला ऊर्जास्त्रोत आहे कारण हे शरीरातील तणाव निर्माण करणाऱ्या घटकांना कमी करण्यासाठी मदत करते. यासाठी एक स्वस्थ आनंदी जीवन जगावं आणि तणावमुक्त राहावंथोडे नवीन जरा जुने