थिजलेला खांदा आणि उपचारपद्धती!


वैद्यकशास्त्रात नवनवीन संशोधन व तंत्रज्ञान विकसित होत आहे. अनेक समस्यांची उत्तरे मिळवण्यात यश येत आहे. थिजलेला खांदा व त्याच्या उपचारपद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. आता विनाशस्त्रक्रियाही उपचार शक्य आहेत. पेन क्लिनिकमध्ये थिजलेल्या खांद्यावर (ऋीेूशप डर्हेीश्रवशी) विनाशस्त्रक्रिया, भूल न देता उपचार केले जातात. थिजलेल्या खांद्याची कारणे : प्रामुख्याने दोन कारणे सांगता येतील. 1) डायबेटीज (मधुमेह), 2) हाडाची झीज (ऑस्टिओआरब्राईड). थिजलेल्या खांद्याची लक्षणे : हात वर नेताना वेदना होणे, केस विंचरताना वेदना होणे, शर्ट किंवा ब्लाऊज घालताना त्रास होणे, हात मागे न जाणे, बर्‍याच वेळा शौचास बसताना त्रास जाणवणे आदी लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात.

उपचार : खांद्याला जाणारी नस मोेकळी करण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सीचा उपयोग होतो. यामध्ये तात्पुरत्या वेळेसाठी (साधारणतः एक-दोन वर्षांपर्यंत) संवेदना ग्राहक नस वेदनारहित केली जाते. त्यामुळे खांद्याच्या वेदना कमी होतात. एकदा नसेच्या वेदना कमी झाल्या की खांद्याचे नियमित व्यायाम करून खांदा नेहमीसारखा मोकळा व पूर्ववत होतो. ही प्रक्रिया मशीनद्वारे केल्याने अचूक व व्यवस्थित होते. थिजलेल्या खांद्यावरील उपचार पद्धतीचे फायदे : खांद्याला कोणत्याही प्रकारच्या चिरा द्यायची गरज पडत नाही. खांद्याला भूल देण्याची आवश्यकता नसते. बर्‍याचदा अशा रुग्णांना पूर्ण भूल देऊन खांदा फिरवण्याचा सल्ला दिला जातो.


या प्रक्रियेत बर्‍याचदा खांद्याला, इतर स्नायूंना इजा होण्याची शक्यता असते. मात्र रेडिओ फ्रिक्वेन्सी मशीनद्वारे उपचार करताना हे टाळता येते. पूर्ण भूल देण्याची गरज नसल्याने हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज पडत नाही. शिवाय आर्थिकदृष्ट्या ही उपचारपद्धती परवडणारी आहे.

घ्यावयाची काळजी : खांद्यासाठी रोज व नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्यानुसारच करणे आवश्यक आहे.

पथ्य - साखर नियंत्रणात ठेवणे, जड वजन उचलणे टाळावे, ज्या खांद्यावर उपचार घेत आहात त्या खांद्यावर कूस करून झोपू नये.

साईड इफेक्टस् - रेडिओ फ्रिक्वेन्सी उपचार केल्याने कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. स्नायूंची ताकद नेहमीप्रमाणेच राहते.

Frozen Shoulder and Treatment!
थोडे नवीन जरा जुने