घरगुती टिप्स ; चुटकीसरशी दूर करा या समस्या
अनेक घरगुती टिप्स आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत; परंतु त्यामागे असलेल्या विज्ञानाशी अजूनही अनभिज्ञ आहोत. हे घरगुती उपाय आरोग्य समस्या चुटकीसरशी कशा दूर करतात त्याबाबत जाणून घेऊया 


टूथपेस्ट:

मधमाशी चावल्यानंतर त्वचेत अनेक विषारी पदार्थ इंजेक्ट (सुई टोचल्याप्रमाणे) होतात. यामुळे पीडितास तीव्र वेदना होतात आणि सूज येते. अनेकवेळा चावल्यानंतर मधमाशी आपला दंश सोडते. त्यातून लागोपाठ विषारी पदार्थ निघत राहतो. अशावेळी त्या जागेवर थोड्या वेळासाठी टूथपेस्ट घासल्याने विषारी पदार्थाचा परिणाम कमी व्हायला लागतो. तसेच टूथपेस्टमध्ये असलेले ग्लिसरीन त्वचेतील विषारी पदार्थाचा परिणाम नष्ट करते.


मेथी दाणे


यामध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. याची मधुमेह्यांसाठी खूप गरज भासते. दुसरे म्हणजे यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. सोबतच मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते.


गाजर:

गाजरामुळे डोळे निरोगी राहतात. कारण गाजर ‘अ’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. साधारणत: जेवणात ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेच डोळ्यांचा प्रकाश कमकुवत होतो. तुम्हाला गाजरासह भरपूर ‘अ’ जीवनसत्त्व असलेल्या खाद्य पदार्थांचेही सेवन करता येईल.


लवंग तेल:


यामध्ये आढळून येणारा युजेनॉल घटक (हा एक सुगंधित पदार्थ असून तो फक्त लवंग तेलातच असतो) नॉसिसेप्टर्स (वेदनांची अनुभूती देणारा रिसेप्टर) ची संवेदनशीलता कमी करतो.


थोडे नवीन जरा जुने