मुली या मुलांकडे आपोआप आकर्षित होतातमुलींना प्रभावित करणे ही देखील एक कला असते. ही कला प्रत्येकाला जमेल असे नसते. तसे बघायला गेले तर, इम्प्रेस करण्यासाठी विशेष असा फंडा उपलद्ध नाही. मुलांमधील काही निवडक गुण ज्यामुळे अनेक मुली त्याच्याकडे आपोआप आकर्षित होतात. 

पण जर तुमच्याकडे मुलींना इंप्रेस करण्यासाठी अशी एकही क्वालिटी नसेल तर काळजी करू नका. तुम्ही यासाठी फक्त तुमच्या व्यक्तीमत्त्वामध्ये थोडासा बदल करणे अपेक्षित आहे. आज आम्ही तुम्हाला मुलींना कसे इंम्प्रेस करावे याबद्दलच्या टिप्स देत आहोत. यामुळे मुली लवकर इंम्प्रेस होतील.

1- साधे मुले


अनेक मुली हुशार असलेल्या मुलांकडे मोठ्या प्रमाणार आकर्षित होत असतात. तसेच जी मुले स्वभावाने सरळ आणि साधा आहे परंतु, वेळ प्रसंगी आक्रामकता दाखवणारे मुले मुलींना विशेष आवडतात. मुलांचा साधा सरळ स्वभाव मुलींना आकर्षित करण्यासाठी खुप महत्त्वाचे आहे.


2- अकडू मुले ब-याच मुलींचे लक्ष जी मुले त्यांच्याकडे लक्ष देत नाही अशांकडे अधिक असते. जी मुले त्यांच्याच धुंदीत रमलेले असतात आणि मुलींना जास्ती भाव देत बसत नाही. त्यामुळे तुमच्या स्वभाव जर मुलांना पाहून आकर्षित होणारा असेल तर तुमच्या भावनांवर थोडेसे नियंत्रण ठेवायला शिका. मुलींसमोर एकदम असा काही व्यवहार करू नका ज्यामुळे तिला तुम्ही तिच्या प्रेमात पडला आहे याची जाणीव होईल.

3-दबंग अनेक मुलींना मुलांचा दबंग स्वभावदेखील मनापासून आवडतो. तसेच मुलींना मुलांचा आत्मविश्वासदेखील आवडतो. लाजरे आणि संकोच करणारे मुले मुलींना अजिबात पटत नाही. त्यामुळे बोलताना लाजण्या ऐवजी आपल्या मनातील भावना बेधडकपणे व्यक्त करणारी मुले मुलींच्या पसंतीस उतरतात.

4-गंभीर मुलींना स्वभावाने गंभीर प्रवृत्तिची मुलेदेखील आवडतात. त्यांना मुलींच्या पाठीमागे फिरणारे मुले बिलकूल आवडत नाही. आय लव्ह यू म्हणत मागे-मागे मागे-पुढे फिरणारी मुले मुलींना अजिबात पटत नाही. अशा मुलांना मुली चिपकू असे समजतात. आत्मसम्मान ठेवणारी मुले मुलींना विशेष भावतात. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मनातील एखादी भावना एखाद्या मुली समोर व्यक्त केली असेल तर, सारखे-सारखे त्याचे उत्तर देण्यासाठी तिच्या मागे लागणे टाळावे.

5- काळजी घेणारा मुलींना त्यांची काळजी घेणारी मुले आवडतात. काळजी घेण्याच्या स्वभावामुळे मुलींना आपण भविष्यात एखाद्या अडचणीत आलो तर ही व्यक्ती आपल्याला सोबत देईल याची खात्री असते. काळजी घेणा-या मुलांवर मुलींचा विश्वास अधिक असतो.

6- आनंदी राहणारे मुलींना नेहमी आनंदी असणारी मुले आवडतात. त्यामुळे नेहमी तुमच्या चेह-यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चेह-यावरून देखील तुमचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज मुली लावत असतात.

7- सम्मान देणारे महिलांचा सम्मान करणारी मुलेदेखील मुलींना आवडतात. महिलांना सम्मान देण्यावरून महिलांबद्दल तुमच्या मनात आदर असल्याची जाणीव होते.


थोडे नवीन जरा जुने