या पुरुषांसोबत मुली अधिक खुश असतात
असं म्हणतात जेव्हा प्रेमाची गोष्ट येते त्यावेळी तुम्ही कसे दिसता हे महत्त्वाचं नसते. सहसा कुठलीही व्यक्ती असाच विचार करते की ति ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडेल ती दिसायला चांगली जरी नसली तरी त्याचे राहणीमान मात्र चांगलेच असायला हवे.
याच विषयावर एक संशोधन करण्यात आले की एका पार्टनर साठी दुसरा पार्टनरचा लूक किती महत्त्वाचा आहे. या मुद्द्यावर रिसर्च केलेल्या महिलांच असं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी पुरुषांचा लोक फार महत्त्वाचा आहे. या संशोधनामध्ये महिलांकडून अनेक आश्चर्य चकित करणारी गोष्ट समोर आलेल्या आहेत. या संशोधना दरम्यान असे लक्षात आले आहे की ज्या महिला कमी आकर्षक पुरुषांसोबत राहतात, त्यांच्या संसारिक जीवनामध्ये अधिक सुखी असतात. त्या त्यांच्या नात्यातही अत्यंत खुश राहतात. हे संशोधन फ्लोरिडा स्टेट यूनिवर्सिटी मधील संशोधकांनी केलेले आहे. या संशोधनादरम्यान त्यांना असे लक्षात आले की ज्या महिला आपल्या पार्टनर पेक्षा अधिक सुंदर आहेत त्या दुसऱ्याच्या तुलनेमध्ये अधिक आनंदी जीवन जगत आहेत त्यांच्या नात्यामध्ये कुठलेही वितुष्ट येत नाही.

या संशोधनामध्ये 113 नवीन जोडपे यांचा समावेश केला गेला होता. या शोधादरम्यान सहभागी झालेल्या जोडप्यांचे एकंदरीत वय तीस वर्षांपेक्षा ही कमी होते आणि त्यांची लग्न होऊन चार महिन्याहुन अधिक कालावधी उलटून गेलेला होता. या संशोधनादरम्यान त्यांना एक प्रश्नसंच दिला गेला त्यात त्यांच्या शारीरिक आरोग्य बद्दलही असणाऱ्या अपेक्षा बद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.

यातील अग्रणीच्या संशोधक तानिया रेनोल्ड्स यांचा असा समज आहे की पती जर फिजिकली आकर्षक असेल तर पत्नींच्या मनामध्ये संशय उत्पन्न होत असतो.

असं शक्यतो त्या महिलांबाबत होतं ज्या स्वतः जास्त आकर्षक नसतात ज्या महिलांचे पती आकर्षक असतात त्या स्वतःला जास्तीत जास्त फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून त्या आपल्या पार्टनर सारखं फिट दिसतील. फ्लोरिडा युनिवर्सिटी मध्ये झालेल्या या रिसर्चमध्ये भाग घेतलेल्या महिलांनी असे सांगितले की डाएट करन्याने काही जास्त फरक पडत नाही पण त्या कारणामुळे या महिला नात्यांमध्ये अधिक सुखी राहतात.

थोडे नवीन जरा जुने