ऑफिसमध्ये तासन्तास खुर्चीवर बसून असता ? ह्या तीन टिप्स नक्की फॉलो करा ...

ऑफिसमध्ये ८ ते ९ तास प्रत्येकाला काम करावंच लागतं मात्र , या वेळेत जरा स्वत: च्या आरोग्याकडे थोडे लक्ष द्या .फार जास्त वेळासाठी एकाच जागेवर बसून राहू नका.बसल्या बसल्या छोटे छोटे वर्कआऊट्स म्हणजे व्यायामाचे प्रकार करणं सहजशक्य आहे.

डेस्कवर काम करणारे तासन्तास खुर्चीवर बसून राहतात .त्यामुळे त्यांना खांदेदुखी , पाठदुखी अशा समस्या होतात .या समस्या होऊ नये , यासाठी कामाच्या मधे छोटे ब्रेक घेणं महत्त्वाचं आहे .
जमेल तितकं उभं राहून काम करा.

आजकाल कामाच्या ठिकाणी उभं राहून काम करण्याचा ट्रेन्ड सुरू आहे .फार जास्त वेळ खुर्चीवर बसल्याने आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात .यावर उपाय म्हणजे जास्तीतजास्त वेळ उभं राहून काम करावं .काही वेळ खुर्चीवर बसून काम करा आणि काही वेळ उभं राहून यामुळे उष्मांकही खर्च होतील आणि कामात मजाही येईल

सकारात्मक ऊर्जा.

कामाचे ठिकाण अर्थात ऑफिस ही आजकाल केवळ काम करण्याची जागा नाहीये .कर्मचा - यांना आरामदायी वाटावं आणि त्यांची काम करण्याची उर्जा वाढावी यासाठी ऑफिसमध्ये आजकाल जिम , लायब्ररी अशा अनेक सुविधा देण्याची पद्धत आहे .ऑफिसमध्ये आल्यावर कर्मचा - यांना कामाचा ताण वाटू नये , हा त्या मागचा मुख्य उद्देश आहे. मेंदू , शरीर आणि काम यात समतोल साधल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह होतो.

कायम फ्रेश राहा.

कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि मूड दोन्ही फ्रेश राहावं यासाठी स्वच्छ वातावरणात श्वास घ्या .असे केल्याने कामातही चांगलं लक्ष लागतं आणि काम चांगलं होतं .कामाच्या ठिकाणी सेटचा वापर करा .डेस्कवर शक्य असल्यास छोटीछोटी झाडे ठेवू शकता.


थोडे नवीन जरा जुने