खराब मूड चांगला करण्यासाठी "ह्या" आहेत काही सोप्या पद्धती...


एखाद्याचा मूड (मन:स्थिती) खराब झाला असेल तर आसपास असलेल्या लोकांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनते. सोबतच नातेसंबंधही बिघडतात. आपला मूड चांगला करणार्‍या सोप्या पद्धतींबाबत जाणून घेऊया.


शांत खोलीत बसून 100 पासून उलट गणती करण्यास सुरुवात करा. हळूहळू तुमचा मूड बदलेल.
मूड खराब आहे म्हणून काय झाले? झोपण्याआधी मुलांना गोष्ट सांगा. त्यामुळे मुले तर खुश होतीलच, तुम्हालाही चांगले वाटेल.

स्वत:जवळ नेहमी विनोदी किश्शांचे पुस्तक ठेवा. जेव्हा मूड खराब होईल, तेव्हा पटकन काढून वाचा.
मूड खराब झाल्यानंतरही उशिरापर्यंत झोपण्याचा प्रयत्न करू नका. सकाळी लवकर उठून वॉक करण्यासाठी निघून जा.स्ट्रेचिंग करा. जेव्हा स्नायू सैल होतील, तेव्हा नक्कीच तुम्हाला बरे वाटेल.

खराब मूडमुळे कामात मन न लागणे साहजिक आहे, पण याचमुळे तणाव अधिक वाढतो. अशा स्थितीत गाडी धुण्याशिवाय आणखी कोणता चांगला पर्याय असू शकतो? काही वेगळे कराल तर चांगले वाटेल.

बागकाम करा. तज्ज्ञांच्या मते रोपट्यांची निगा राखणे, त्यांना पाणी घालणे व नवी रोपटी लावल्यामुळेदेखील मनाला आनंद होतो. बाग असल्याने पक्षी तुमच्या घराकडे आकर्षित होतील.

Here are some simple ways to improve a bad mood
थोडे नवीन जरा जुने