हाडे ठिसूळ होण्यामागे 'हि' आहेत कारणे,जाणून घ्या !


आपण सतत ‘ऑस्टियोपोरोसिस’ म्हणजे ‘हाडांचा ठिसूळपणा’ हे नाव ऐकत असतो. घरात वृद्ध व्यक्ती असली की हा शब्द अधिक कानावर पडतो. सायलेंट डिसीज म्हणून ओळखला जाणारा हा आजार शांतपणे हाडांचा क्षय करतो व हाडे फ्रॅक्चर होतात. याेग्य वेळी प्रतिबंध व उपचार केला नाही तर हा आजार व्यक्तीला मृत्यूच्या दरीत नेतो. पूर्वी वृद्धापत्कालीन दुखणं म्हणून दुर्लक्षित हा आजार अलीकडेत तिसाव्या वर्षीच अनेकांमध्ये दिसताे. त्यामुळे वैयक्तिक, आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक ओझे वाढत आहे. याला ‘burden of disease’ असे म्हणतात आणि असे ‘burden of disease’ प्रत्येक कुटुंबावर कमीत कमी २ ते ३ लाख रुपयांचे भार आणते व तसेच वैयक्तिक, आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक खच्चीकरण करते.

या आजाराची लक्षणे

> हाडांचे, सांध्यांचे दुखणे.
कंबरदुखी, मणक्यांचे विकार,
फ्रॅक्चर इत्यादी.

या आजारांची कारणे
> व्हिटामीन्स/ जीवनसत्त्वांची कमतरता.
> प्रोटिन्स आणि कॅल्शियमची कमतरता.
> इतर मिनरल्सची कमतरता.
> अवेळी व अयोग्य आहार
> व्यायाम न करणे.
> आळशी जीवनशैली
> वाढते वय
> धूम्रपान
> मधुमेह
> थायराॅइडचे आजार
> फीट्ससारख्या रोगांवर घेतल्या जाणाऱ्या औषधाचे अतिसेवन, स्टेरॉइड
> महिलांची मासिक पाळी अकाली बंद होणे.
Here are the reasons why bones are bruised
थोडे नवीन जरा जुने