तुन्ही निराशेचा सामना कोणत्या प्रकारे करता ? हे नक्की वाचा....


निराशा ही प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असते. काही लोक निराशेवर मात करतात काहींना ते जमत नाही. निराशेच्या स्थितीत यशस्वी लोकांचे प्रतिक्रिया अयशस्वी लोकांच्या तुलनेत खूप वेगळी असते.

तुमचे जीवन आणि कामातील यशाचा संकेत या गोष्टीवरुन मिळतो की , तुन्ही निराशेचा सामना कोणत्या प्रकारे करता ? कारण तुम्ही नेहमी निराशेला टाळू शकत नाही. केवळ हीच गोष्ट महत्त्वाची ठरते की , जेव्हा नको असताना आणि अचानक निराशा आली तर तुम्ही तिचा सामना कसा करता.

काय तुम्ही तिला आपल्यावर वर्चस्व मिळवू देता ? काय तुम्ही कोसळता ? संतापता आणि दूसऱ्यान्वर आरोप ठेवून त्यांच्यावर राग काढता ? किंवा स्वत : ला नियंत्रित करून प्रभावशाली मार्गाने प्रतिक्रिया देता ?

यशस्वी लोक निराशेला लक्ष्याच्या मार्गातील साथी मानतात. तेथेच अयशस्वी लोक निराशेला आपल्या मार्गातील बाधा मानण्याची संधी देतात. यशस्वी लोक निराशेतून बाहेर पडून पुढे जातात. अयशस्वी लोक एक तर आपले लक्ष्य मागे सोडतात किंवा त्याच्या पासून मागे हटतात.

थोडे नवीन जरा जुने