दिवसाला किती व्हिटॅमिन ‘सी’ ची गरज असते? जाणून घ्या व्हिटॅमिन ‘सी’चे महत्त्वाचे स्रोत
व्हिटॅमिन सी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक गोष्ट चटकन येते. ती म्हणजे लिंबू किंवा संत्रा. या दोन फळासोबत इतरही काही फळे आणि भाज्यासुद्धा आहेत. ज्यात मोठय़ा प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. या पदार्थांचा स्वयंपाकात समावेश केल्याने अँटिऑक्सिडंट आणि प्रतिकारक्षमता सुधारते.


जाणून घ्या व्हिटॅमिन ‘सी’चे महत्त्वाचे स्रोत

लाल टबू मिरची :
हरित गृहात तयार केलेल्या लाल टबू (ढोबळी) मिरचीमध्ये देखील जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. एका टबू मिरचीत 152 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी उपलब्ध होते.


ब्रोकली :
एक कप शिजवलेल्या ब्रोकलीमधून 101 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी मिळते. या पदार्थातून इतरही अनेक पोषक पदार्थ शरीरास मिळतात.


स्ट्रॉबेरी :
एक कप स्ट्रॉबेरीमध्ये 17.6 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी आढळते. हे प्रमाण दैनंदिन गरजेच्या 130 टक्के इतके आहे.


रताळे :

एका मोठय़ा आकाराच्या रताळ्यात 36 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी असते. याची चव गोड जरी असली तरी यात सुप्त प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. दैनंदिन गरजेच्या एकूण प्रमाणापैकी 48 टक्के गरज रताळ भागवू शकते.


कोबी :

एक कप शिजवलेल्या कोबीमधून 89 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी मिळते. म्हणजे यातून दिवसभरासाठी लागणार्‍या व्हिटॅमिन सीच्या गरजेच्या 119 टक्के इतके असते.


पपई :
एका पपईमध्ये 185 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी आढळते. म्हणजे दैनदिन वापराच्या एकूण गरजेच्या 247 टक्के व्हिटॅमिन सी यातून मिळते.


किवी :
दोन मध्यम आकाराच्या किवीमध्ये 141 मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी असते. म्हणजे दैनदिन गरजेच्या 188 टक्के इतके हे प्रमाण आहे.
वयोर्मयादा गरज
1 ते 8 वर्षे वयोगट 15 मिलिग्रॅम
4 ते 8 वर्षे वयोगट 25 मिलिग्रॅम
9 ते 13 वर्षे वयोगट 45 मिलिग्रॅम
14 ते 18 वर्षांपर्यंत (मुले) 75 मिलिग्रॅम
14 ते 18 वर्षांपर्यंत (मुली) 65 मिलिग्रॅम
प्रौढ पुरुष 90 मिलिग्रॅम
प्रौढ स्त्री 75 मिलिग्रॅम
गरोदर महिला 75 मिलिग्रॅम
नवजात बालक 120मिलिग्रॅम
थोडे नवीन जरा जुने