ब्यूटी रूटीन : ऑलिव्ह ऑइलचा समावेश कसा असावा?


1. मेकअप रिमूव्हर - ऑलिव्ह ऑइलमधील फॅट्स मस्कारा आणि लायनर सहजपणे काढतात, तर सामान्य क्लेंजरद्वारे ते काढणे अवघड ठरू शकते. ऑलिव्ह ऑइलचा वापर केल्यास त्वचा कोरडी होत नाही. डीप क्लीनिंगसाठी सोबत वॉटर बेस्ड फोमचा वापरही केला जाऊ शकतो. 

2. हेड-टू-टो मॉइस्चरायझर - अंघोळीनंतर ओल्या त्वचेवर ऑलिव्ह ऑइल लावता येऊ शकते. ते चेहऱ्यापासून पायापर्यंत लावू शकता. ते लावल्यानंतर त्वचा खूप प्लंप वाटू शकते. उशिरापर्यंत हायड्रेटेडही राहील. 

3. फ्रिज फ्री केसांसाठी- कोरडे केस पाणी खूप सहज शोषून घेतात आणि सोडतात. त्याचा अर्थ प्रत्येक केस ओला झाल्यावर लगेच कोरडा होतो. त्याला 'हायड्रल फटीग'ही म्हणतात, त्यामुळे स्प्लिट एंड्स होतात आणि केस तुटतात. ऑलिव्ह ऑइल घट्ट असते. ते केसांसाठी खूप फायदेशीरही असते. त्यामुळे केस मोकळे होतात. शॅम्पूनंतर केसांना शेवटपर्यंत लावल्याने ते पोस्ट-शॅम्पू सिरमचे कामही करते. 

4. लिप-स्क्रब- लिप बाम खूप सहजपणे हरवतो. त्यामुळे जेव्हा तो तुमच्याजवळ नसेल तेव्हा ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जाऊ शकतो. ते ओठांना हायड्रेट तर करतेच शिवाय त्यांना मऊही बनवते. फाटलेल्या ओठांसाठीही ते खूप परिणामकारक आहे. मेकअप लावण्याआधी ऑलिव्ह ऑइल साखरेसोबत मिक्स करा आणि लिप स्क्रबप्रमाणे वापरा. 

5. कोरड्या हातांना मऊ बनवते- कोरड्या हातांवर ऑलिव्ह ऑइल लावल्याने त्वचा मऊ होते आणि सन डॅमेजपासूनही वाचते. हातात शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत लवकर रिंकल्स येतात. त्यामुळे त्यांना मॉइस्चराइज करणे खूप आवश्यक आहे. ऑलिव्ह ऑइल त्वचेला एजिंगपासून वाचवते. 

6. बॉडी शेव्हिंगसाठी- पारंपरिक शेव्हिंग क्रीम किंवा जेलशिवाय ऑलिव्ह ऑइलचा वापर तुम्ही करू शकता. ते शेव्हिंगदरम्यान त्वचेला हायड्रेट करते. ते त्वचेवर खूप सहजपणे ग्लाइड होते. त्यामुळे कट्स लागण्याचा धोका संपतो. फेस शेव्हिंगसाठी त्याचा वापर करू नये. 

7. मेकअप ब्रश क्लीनर- चेहऱ्यावर केलेला मेकअप स्वच्छ करण्यासाठी ज्याप्रकारे तेल चांगले असते त्याचप्रमाणे कोमट पाणी, साबण आणि ऑलिव्ह ऑइलच्या मिश्रणात मेकअप ब्रश सहजपणे धुतला जाऊ शकतो. विशाल मुद्गिल, व्हीएलसीसी मेकअप ब्रश क्लेंजर आणि फ्रिज सिरमही आहे ऑलिव्ह ऑइल.
थोडे नवीन जरा जुने