पती नेहमी राहील खुश फक्त या दोन गोष्टी करा
 नाती खूप नाजूक असतात. नात्यातील गोडव्याने दाम्पत्य जीवनात आनंद येतो. ज्याप्रमाणे आपण आपले घर व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवतो जेणेकरुन आरोग्य चांगले रहावे. त्याचप्रमाणे नात्यांचे आरोग्य जपण्यासाठी पती-पत्नी दोघांनी तितकाच पुढाकार घेणे गरजेचे आहे. रिलेशनशिप एक्सपर्ट्सच्या मते तुमच्यामध्ये मतभेद जरी असले तरी त्यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येता कामा नये आज आम्ही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे रिलेशनशिप अधिक मजबूत होईल.

जसे आहात तसे रहा

वैवाहिक नाते सफल होण्यासाठी तुम्ही जोडीदारासोबत जसे आहात तसे राहणे महत्त्वाचे असते. सांगण्याचा अर्थ हा की समाज आणि कुटुंबात तुम्ही आदर्श व्यक्तीप्रमाणे वागता मात्र जोडीदारासोबत तुमचे वर्तन वेगळेच अशेल तर एक दिवस तुमच्यात मतभेद येऊ शकतात. त्यामुळे जोडीदाराप्रती आपली वागणूक चांगली ठेवा.

एकमेकांना सतत सरप्राईज देणे गरजेचे

नात्यात गोडी टिकवून ठेवायची असेल तर वेळोवेळी एकमेकांना सरप्राईज द्या. हे सरप्राईज काहीही असू शकते जसे सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जाण्याचा प्रोग्राम बनवा. नाहीतर एखाद्या चांगल्या सिनेमाचे तिकीट बुक करा. सरप्राईज पार्टी वा कँडल लाईट डिनर ठरवा. तुमच्या पार्टनरला खायला काय आवडते हेही तुम्ही बनवू शकता. या लहान लहान गोष्टी तुमचे नाते मजबूत करण्यासाठी अधिक मदत करतील.

सुट्टीचा आनंद

एकमेकांसाठी वेळ काढा. जे काम तुम्हाला एकत्रित करण्यात मजा येते ते करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ एकत्रित बसून सिनेमा पाहा. गाणी ऐकणे, किचनमध्ये मदत करणे, एखाद्या पार्कात जा. असं गरजेचं नाही की तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तरच तुम्ही मजा करु शकता. घरी बसूनही तुम्ही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवू शकता. 

अनुभव शेअर करा

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये सतत आपण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतो यावर समस्येवर उपाय म्हणजे आपला अनुभव शेअर करा. आपल्या जोडीदारासोबत लहान लहान गोष्टी शेअर करा. दरम्यान यामुळे आपला जोडीदार डिस्टर्ब तर होत नाही आहे याकडेही लक्ष द्या. तुम्ही हवं तर ऑफिसमधून घरी आल्यावर, चहा पिताना जोडीदाराशी गप्पा मारु शकता.
थोडे नवीन जरा जुने