अन्नातून विषबाधा झाली तर त्यावर काय उपाय कराल?घाण पाणी आणि उघड्यावरील अन्नाचे सेवन केल्याने पोटात संसर्ग आणि विषबाधा होण्याचा धोका जास्त असतो. मात्र, केवळ बाहेरचे जेवण घेतल्यानेच विषबाधा होते, असे नाही.घरीसुद्धा स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर पोटाचे आजार होऊ शकतात.
ही आहेत लक्षणे
खराब किंवा शिळे अन्न सेवन केल्याच्या एक तासाच्या आतच पोटात दुखणे, अतिसार, उलटी होणे इत्यादी त्रास सुरू होतो. ही लक्षणे अनेकदा 10 दिवसानंतरही दिसून येतात. तसेच केमिकलयुक्त किंवा विषाक्त अन्नाचे सेवन केल्यानंतर उलटी, अतिसार, घाम येणे, डोळ्यातून पाणी येणे, जास्त थुंकी येणे, पोट दुखणे, डोके गरगरणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
हे आहेत उपाय
जर समस्या प्राथमिक स्वरूपाची असेल तर घरच्या घरीच उपचार केले जाऊ शकतात. भरपूर पाणी प्यावे आणि दारू, कॅफीन किंवा साखरयुक्त पेय पदार्थांचे सेवन बंद करावे. यादरम्यान इलेक्ट्रोल किंवा लापशी प्यावी. यामुळे शरीरातून निघालेले पाणी पुन्हा शरीरात परत येईल आणि आराम मिळेल. पोट खराब झाले असेल तर काळा चहा प्यावा. एक चमचा मेथी दाणे, पाणी आणि ताक मिसळून पेय तयार करावे. याचे सेवन केल्याने आराम मिळेल.


डॉक्टरांना दाखवा
जर तापासोबत शौचातून रक्त येत असेल, वारंवार उलटी होत असेल, शरीरातील पाणी कमी होत असेल आणि हा त्रास तीन दिवसांपेक्षा जास्त काळ होत असेल तर डॉक्टरांना दाखवावे. जर तोंड सुकत असेल, यूरिन कमी येत असेल, चक्कर, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.


ही काळजी घ्या
तुमच्या घरी जर पाळीव प्राणी असतील तर त्यांना स्पर्श केल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे.


बर्‍याच वेळापासून उघडे असलेले आणि त्यातून वास येत असलेले अन्न सेवन करू नये. जर डबाबंद जेवणाची एक्स्पायरी डेट संपली असेल तर तेसुद्धा खाऊ नये.


जेवण केल्यानंतर लगेच शिल्लक राहिलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवावे.


खास करून हिरव्या भाज्या शिजवण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्यात.


अभिनेत्री शर्मिला टागोर यांना काही दिवसांपूर्वीच अन्नातून विषबाधा झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.थोडे नवीन जरा जुने