नात्यात दुरावा आला असेल तर मग हे करा !

नाते जितके जुने असते तितकाच नात्यातला अनुभव ही मोठा असतो. आयुष्य म्हंटले की चुका या होतातच मग झालेल्या चुकांचा बऱ्याचदा गैरसमज होतो आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. परंतु हा दुरावा जर असाच कायम राहिला तर नाते तुटण्यापर्यंत सुद्धा वेळ येऊ शकते. असे होवू नये यासाठी दोघांनाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. आपला इगो महत्वाचा की नाते ? हा प्रश्न अश्यावेळी स्वतःला विचारणे गरजेचे असते. 


या बाबतीत एक रिसर्च करण्यात आला होता. त्यानुसार सकारात्मक विचार हे नाते टिकविण्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे समोर आले. सकारात्मक विचार पार्टनरच्या जवळ घेऊन जाण्यास मदत करतो आणि यामुळे दोघांचाही एकमेकांप्रति विश्वास वाढतो. नकारात्मक विचार नेमका याच्या उलट प्रभाव करतो. 

तज्ज्ञांनुसार, सकारात्मक विचार पार्टनरबाबत प्रेम आणि जवळीकता वाढवण्यास फायदेशीर ठरतो. कारण सकारात्मक विचाराने दोघेही एकमेकांमधील चांगल्या गोष्टी जाणू घेऊ शकतात. तेच जर त्यांनी नकारात्मक विचार केला तर ते केवळ एकमेकांमधील वाईट गोष्टीच शोधत राहतात. या रिसर्चसाठी अभ्यासकांनी ४० लोकांना यात सहभागी करुन घेतले होते. त्यांना त्यांच्या सद्याच्या जोडीदाराचे आणि एक्सचे फोटो दाखवण्यात आले. 

त्यांना सांगण्यात आलं की, या फोटोंकडे सकारात्मक विचाराने बघा. तसेच त्यांच्या नात्याला आणि भविष्यालाही वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्यास सांगण्यात आलं.त्यानंतर त्यांना हेच फोटो नकारात्मक विचाराने बघायला सांगण्यात आलं. त्यानंतर या रिसर्चमधून हे आढळलं की, सकारात्मक विचार करतेवेळी त्यांचे मेंदू मजबूत होते आणि नकारात्मक विचार करताना कमजोर हो ते.

If there is a problem with the relationship, then do it
थोडे नवीन जरा जुने