तुम्हीही जास्त प्रमाणात मीठ खात असाल तर,हे नक्की वाचा !

चिमुटभर मिठाने खाण्यात चव येते किंवा बिघडते. मीठ खाण्याविषयी अनेक संभ्रम आहेत. तसे पाहिले तर मीठ खाण्यात वाईट असे काही नाही, मात्र चुकीच्या प्रमाणात मीठ खाल्ले तर मात्र गडबड होऊ शकते. 


योग्य प्रमाणात मीठ खाण्याने चयापचय क्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. मीठामुळे शरीराची आर्द्रताही टिकून राहाते. परंतु हे योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे.

आपल्या शरीरासाठी मीठाचे प्रमाण कमी किंवा अधिक झाले तर संतुलन बिघडून जाईल. अनेक आजार मागे लागतील. अधिक मीठ खाल्लयाने उच्च रक्तदाब आणि त्वचारोगाला सामोरे जावे लागेल.

निसर्गात मीठाचे किमान 25 प्रकार आहेत. यातील चुना, आयोडीन, गंधक, कॅल्शियम, फॉस्फोरस, क्लोरिन आदी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. 

हे सर्व आपल्याला हिरव्या पालेभाज्यांतून मिळतात. त्यामुळे कृत्रिम किंवा बाहेरून कमी मीठ खा. अधिक मीठ, अधिक तहान परिणाम आजार. म्हणून अधिक मीठ खाऊ नका. 

अधिक मीठामुळ रक्तदाब तर वाढतोच शिवाय अधिक मीठ खाल्लयाने केसही झडू लागतात. टक्कल पडते.

जास्त मीठ खाल्ल्याने अनिद्रेला सामोरे जावे लागते. कमी मीठ खाल्लयाने चांगली झोप लागते. अधिक मीठ खाल्लयाने वातजन्य आजार होतात. म्हणून कमी मीठ खा. महिलांनी गर्भावस्थेत कमी मीठ खावे. याने अनेक आजार दूर राहातील. अधिक मीठ खाणे म्हणजे लठ्ठपणाला निमंत्रणच. शक्य तेवढे मीठाचा वापर कमी करा.

If you are consuming too much salt, definitely read this
थोडे नवीन जरा जुने