रात्री उशिरा जेवण करत असाल तर होऊ शकतात आरोग्यावर विपरीत परिणाम...


आजकाल लोक जेवायला खूप उशीर करतात. यामुळे त्यांच्या झोपण्याच्या वेळेस आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जर आपणदेखील लेट नाइट डिनर घेत असाल, तर एकदा त्याचे होणारे नुकसान जाणून घ्या. निरोगी आयुष्यासाठी वेळेवर झोपणं, सकाळी योग्य वेळी जागणं आणि योग्य वेळी खाण्याच्या नियमानुसार, आयुर्वेदातदेखील लिहिलं आहे. जर आपणही रात्री उशिरा जेवत असाल, तर तुम्हाला खाली दिलेल्या गोष्टींचा सामना करावा लागेल.

वजन वाढणं : जर आपण रात्री उशिरा जेवत असाल, तर ते पचविणंदेखील कठीण असतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. त्याशिवाय रात्री उशिरा जेवण करणं वाढत्या लठ्ठपणाचं एक कारणदेखील आहे.

तणाव : जर तुम्ही उशिरा जेवण करीत असाल, तर झोपण्यासदेखील त्रास होतो. ज्यामुळे दिवसभर थकवा आणि तणाव राहतो. ज्याने कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी लवकर जेवण सुरू करा.

उच्च रक्तदाब : रात्री उशिरा जेवण केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा व्यायाम शरीराला होत नाही, त्यामुळे अन्न पचण्यास त्रास होतो व उच्च बीपीची समस्या येते.

मधुमेह : अन्न खाल्ल्यानंतर बऱ्याचदा लोक गोड खातात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. जे नंतर त्रासदायक होऊ शकते. रात्री लवकर जेवण करा आणि फिरादेखील.

अपचन : ज्या लोकांना अपचनाचा त्रास असतो, त्यांनी उशिरा कधीच जेवण करू नये. यामुळे त्रास अजून वाढू शकतो.

चिडचिडपणा : आपण आराम करण्यासाठी पुरेशी झोप घेत नसाल, तर हे आपल्या मानसिक आरोग्यास देखील प्रभावित करते. मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही, परिणामी चिडचिडपणा येतो.

झोप न येणं : बऱ्याचदा रात्री उशिरा जेवण्याने अन्न फूड पाइपमध्ये येऊ लागतो. यामुळे अस्वस्थता आणि घबराटपणा येतो आणि झोप येत नाही.

If you are eating late at night, it can have adverse health effects
थोडे नवीन जरा जुने