डोकेदुखीकडे दुर्लक्ष करत असाल तर, वेळीच व्हा सावध !

शरीरामध्ये कुठल्याही अवयवांना होणारी वेदना ही त्रासदयाकच असते. डोकेदुखी ही वेदना तशी सर्वसामान्य असली तरी त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि कारणेही वेगवेगळी असू शकतात. कधी कधी पित्तामुळे डोके दुखू शकते तर कधी कधी डोळ्यांच्या समस्येमुळे डोके दुखू शकते. 


‘ब्रेन न्युरीज्म या आजारातही तीव्र डोकेदुखी होत असते. बर्याचदा डोकेदुखीचा त्रास आपण फारसा गांभीर्याने घेत नाही. परंतु ‘ब्रेन न्युरीज्म’ या आजारातील वेदनेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. कारण हा एक गंभीर आजार आहे. माणसाच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी साचण्याच्या प्रक्रियेला ‘ब्रेन न्युरीज्म’ असे म्हणतात.

मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यामध्ये काही गुठळ्या जमल्यामुळे शुद्ध रक्ताचा पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळेच असहाय वेदना त्याठिकाणी निर्माण होतात. योग्यवेळी या त्रासावर उपचार केले नाहीत तर ‘ब्रेन हयाम्रेज’ देखील होऊ शकते.
‘न्युरीज्म’ हा आजार शरीरातील कुठल्याही भागात होऊ शकतो. हा आजार प्रामुख्याने तीन प्रकारचा असतो. ‘ब्रेन न्युरीज्म’, ‘डिसेक्शन न्युरीज्म’ आणि ‘फ्युजीफोरम न्युरीज्म’ हे ते तीन प्रकार आहेत. जगभरतील ०.६ ते ३.६ टक्के लोकांना हा आजार दिसून येतो. 

अलीकडेच अभिनेता सलमानला या आजाराने ग्रासले होते. परदेशात त्याने या आजारावर इलाज करून घेतले.या आजारात रुग्णाला इतक्या तीव्र वेदना होतात कि, या वेदना तो सहनच करू शकत नाही. 

गळ्यात तीव्र वेदना होणे, डोळ्यात वेदनेची तक्रार निर्माण होणे, एकाच वस्तूचे दोन-दोन प्रतिबिंब दिसणे, सुस्पष्ट न दिसणे, उलटी होणे, चेहऱ्याच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला तीव्र वेदना होणे, अशा प्रकारची काही लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि योग्यप्रकारे उपचार करून घ्यावेत. 

साधारणपणे 35 ते 60 वयोगटातील लोकांना हा आजार होतो. हा आजार होण्यामागची प्रमुख करणे म्हणजे अनुवांशिकता, डोक्याला झालेली जखम आणि उच्च रक्तदाबाची समस्या ही होय. योग्य वेळी या आजाराचे निदान करून त्यावर उपचार केले तर हा आजार बरा होऊ शकतो हे लक्षात घ्यावे.

If you are ignoring headaches, be on time
थोडे नवीन जरा जुने